Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO: उमरानच्या रॉकेटगतीने बुमराहचा विक्रम मोडीत, श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करत फिरवला सामना

VIDEO: उमरानच्या रॉकेटगतीने बुमराहचा विक्रम मोडीत, श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करत फिरवला सामना

January 4, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Umran Malik, Hooda & Ishan Kishan

Photo Courtesy: Twitter/ SunRisers Hyderabad


भारत विरुद्ध श्रीलंका (INDVSL)यांच्यात टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (3 जानेवारी) खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 2 धावांनी थराराक विजय मिळवला. या सामन्यात उमरान मलिकने त्याच्या वेगवान गोलंदाजीने पुन्हा एकदा चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. या सामन्यात त्याने असाच एक वेगवान चेंडू टाकला ज्याचा बळी श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) ठरला आणि जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला गेला. मलिकच्या या जलदगती चेंडूचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात उमरान मलिक (Umran Malik) याने 4 षटकात 27 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने सामन्यातील 17व्या षटकातील चौथा चेंडू 155 किमी प्रतितास वेगाने टाकला. जो या सामन्यातील सर्वात जलदगती चेंडू ठरला. या चेंडूवर शनाकाने चौकार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पॉईंटवर उभ्या असलेल्या युझवेंद्र चहल याने झेल घेतला आणि शनाका 27 चेंडूत 45 धावा करत तंबूत परतला. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या या विकेटने सामना पालटला.

Umran Malik not just spitting fire but also improving his line and length 👏

— Irfan Pathan (@IrfanPathan) January 3, 2023

उमरानच्या त्या चेंडूने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचा विक्रम मोडला गेला. त्याच्याआधी भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर होता. बुमराहने 153.36 च्या वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर मोहम्मद शमी (153.3 किमी प्रतितास ) आणि नवदीप सैनी (152.85 किमी प्रतितास). चाहत्यांनी उमरानचे कौतुक केले आहे.

Umran Malik on Fire🔥
Umran malik took wicket of Dashun Shanaka by bowling at 155 Km.. OMG! #UmranMalik #INDvSL pic.twitter.com/yqVeADBUxV

— NAFISH AHMAD (@nafeesahmad497) January 3, 2023

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. भारताने दीपक हुडा (नाबाद 41) आणि अक्षर पटेल (नाबाद 21) यांंच्या सहाव्या विकेटच्या नाबाद 68 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 20 षटकात 5 विकेट्स गमावत 162 धावसंख्या उभारली. यामध्ये सलामीवीर ईशान किशन यानेही 29 चेंडूत 37 धावा केल्या होत्या.

1️⃣5️⃣5️⃣ reasons to love Umran Malik 💙

The #JammuExpress' fastest delivery in 🇮🇳 colours!#INDvSL #TeamIndia #OrangeArmy pic.twitter.com/t60mdgQg5V

— SunRisers Hyderabad (@SunRisers) January 3, 2023

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अडखळत सुरूवात झाली. त्यांनी 51 धावसंख्येवरच 4 विकेट्स गमावल्या होत्या. नंतर शनाकाने सहाव्या विकेटसाठी वानिंदू हसरंगा याच्यासोबत 23 चेंडूत 40 धावांची भागीदारी केली. यामुळे श्रीलंका जिंकणार की काय असे वाटत असताना मावी आणि उमरानने प्रभावी गोलंदाजी केली. भारताने हा सामना जिंकत तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात खेळला जाणार आहे.

(Umran Malik breaks Jasprit Bumrah record dismissing Dasun Shanaka Turns match INDvSL 1st T20)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
15 वर्षीय मानस धामणेची पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत कडवी झुंज
मानलं हार्दिकच्या कॅप्टन्सीला! अखेरच्या षटकात खेळलेला जुगार ठरला फायद्याचा; विजय झाला सुकर


Next Post
Hardik Pandya

'मी या संघाला संकटात...', शेवटचे षटक अक्षरला देण्यामागचे कारण हार्दिकने केले स्पष्ट

Marnus Labuschagne

AUSvSA: सामन्यादरम्यान मार्नस लॅब्यूशेनचा सिगारेट पिण्याचा इशारा! कारण चकित करणारे, व्हिडिओ व्हायरल

Hardik Pandya & Shivam mavi

INDvSL: विकेट घेण्यात हार्दिक अपयशी, मात्र नोंदवला अनोखा विक्रम! 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कॅप्टन

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143