हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. दोन सामन्यांची ही टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार हार्दिकने भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी महत्वाचे संकेत दिले होते. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये काही नवीन चेहरे दिसू शकतात अशी आशा सर्वांनाच होती. ही आशा आता पूर्ण झाली आहे. युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत रिषभ पंतने भारताचे नेतृत्व केले. पंतच्या नेतृत्वात मालिकेतील पाचही टी-२० सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केला गेला नाही. अशात उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या युवा खेळाडूंची पदार्पणासाठीची प्रतिक्षा लांबली होती.
दरम्यान, आता शेवटी उमरानला संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे उमरानला निळ्या जर्सीत खेळताना पाहण्याची प्रतिक्षा आता संपली आहे. त्यामुळे आता सर्व जबाबदारी उमरानच्या खांद्यांवर आहे. त्याला आपल्या नावाला आणि प्रतिभेला साजेशी कामगिरी करण्याची जबाबदारी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रेयाल पुणे युनायटेड, कमांडो, सिटी पोलिसची आगेकूच
‘रोहित नसला तर विराटला करा कॅप्टन’, ट्वीटरवर चाहत्यांची एकसुरात मागणी
भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांत कोणत्या खेळाडूवर असेल नजर? वाचा सविस्तर