वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. सबिना पार्क मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने १०९ धावांनी विजय मिळवला. ही मालिका १-१ च्या बरोबरीत सुटली आहे. तसेच पाकिस्तान संघाकडून फावद आलमने या डावातील पहिल्या शतकात तुफानी शतक झळकावले होते. आता क्षेत्ररक्षण करत असतानाही त्याचा जलवा पाहायला मिळाला आहे. त्याने एक अप्रतिम झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवण्यासाठी ३२९ धावांचे आव्हान दिले होते. हा आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला अवघ्या २१९ धावा करता आल्या. तर झाले असे की,वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी सुरू असताना ४० वे षटक फेकण्यासाठी शाहीन आफ्रिदी गोलंदाजीला आला होता.
या षटकातील शेवटचा चेंडू आफ्रिदीने बाऊन्सर चेंडू टाकला होता. ज्यावर, ब्लॅकवूडने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटचा कडा घेत हवेत गेला. त्यावेळी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या फावद आलमने धावत जाऊन मागच्या बाजूला डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. हा झेल टिपल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/SaghirSiyal/status/1429982612668440580?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1429982612668440580%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Ffawad-alam-takes-a-superb-catch-to-dismiss-blackwood-watch-video-82064
या झेलमुळे तर फवाद चर्चेत आलाच, परंतु पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर देखील त्याचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले होते. फावदने पहिल्या डावात फलंदाजी करताना १२४ धावांची खेळी केली होती. या शतकासह पाकिस्तान संघाने सामन्यावर पकड मजबूत केली होती. पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिज संघाला सामना जिंकण्यासाठी ३२९ धावांचे आव्हान दिले होते.(Unbelievable catch taken by Fawad Alam at slip)
या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. वेस्ट इंडिज संघाकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. तर ब्रॅथवेटने ३९ धावांची योगदान दिले. पाकिस्तान संघाकडून वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दोन्ही डावात मिळून १० गडी बाद केले. ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडिज संघाचा डाव २१९ धावांवर संपुष्टात आला. हा सामना पाकिस्तान संघाने १०९ धावांनी जिंकला. तसेच ही मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली.
महत्त्वाच्या बातम्या –
खळबळजनक खुलासा! लॉर्ड्सच्या लॉन्ग रूममध्ये भिडले होते कोहली अन् रूट, कारणही होते मोठे
भारतीय क्रिकेटर मंधाना आहे कसोटी क्रिकेटची चाहती, पाहायला आवडते कोहली-अँडरसनमधील वैर