विश्वचषक 2023 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारी (16 नोव्हेंबर) खेळला जात आहे. हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर खेळला जातोय. असे असतानाच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेवर दबाव आणत त्यांचे आघाडीचे चार फलंदाज केवळ 24 धावांमध्ये माघारी धाडले. असे असतानाच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याने घेतलेला एक निर्णय सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Temba Bavuma said "I am not 100 percent fit". pic.twitter.com/wH4N9plq6H
— Johns. (@CricCrazyJohns) November 16, 2023
आपला पहिला विश्वचषक अंतिम सामना खेळण्याच्या दिशेने विचार करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, नाणेफेक करण्यासाठी येताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमा लंगडत आलेला दिसला. त्यावेळी त्याने हे देखील म्हटले की, मी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तसेच फलंदाजीला आल्यावर तो पहिल्या षटकात चार चेंडू खेळून एकही धाव न करता बाद झाला. या विश्वचषकात तो एकदाही 35 धावांच्या पुढे गेला नाही.
बवुमा बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांच्यावर दडपण वाढलेले दिसले. स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये असलेले डी कॉक, मार्करम व डसेन हे देखील झटपट माघारी परतले. त्यामुळे त्यांनी अवघ्या 24 धावांमध्ये आपले चार महत्त्वाचे फलंदाज गमावले.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या नियमानुसार प्रत्येक सामन्यात तीन कृष्णवर्णीय खेळाडूंना खेळवणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपाध्यक्ष सामन्यात खेळत असलेल्या संघात बवुमासह वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा व तबरेझ शम्सी हे दोघे कृष्णवर्णीय खेळाडूंच्या कोट्यातून खेळत असतात. तर या सामन्यातून लुंगी एन्गिडी व ऍंडिले फेकलुकवायो यांना बाहेर करण्यात आले.
(Unfit South Africa Captain Temba Bavuma Playing In Semi Final Against Australia)
महत्वाच्या बातम्या –
IND vs NZ Semi Final: जेव्हा सर्वांसाठी व्हिलन बनला होता शमी, बुमराहनेही लपवलेलं तोंड- Video
Semi Final 2: पावसामुळे SAvAUS सामना रद्द झाला, तर भारतासोबत कोणता संघ खेळणार Final? लगेच घ्या जाणून