बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याचा शुक्रवार (23 डिसेंबर) दुसरा दिवस. पहिल्याच सत्रात भारताचा कर्णधार केएल राहुल केवळ 10 धावा करत तंबूत परतला. मागील सामन्यात उल्लेखनीय नेतृत्व करणारा राहुल फलंदाजीत मात्र अपयशी होत आहे. दुसऱ्या सामन्यातही तो लवकर बाद झाल्याने चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुल (KL Rahul) 22 आणि 23 धावाच करू शकला. तो रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. तो सामना भारताने 188 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताला याच विजयाची प्रतिक्षा होती, मात्र राहुलनेही फलंदाजीत उत्तम कामगिरी करावी अशी चाहत्यांची इच्छा होती. तो या कसोटी मालिकेत लागोपाठ तीनदा कमी धावसंख्येवर बाद झाल्याने चाहते म्हणाले, याच्यापेक्षा गोलंदाज तरी अधिक धावा करतील. एकाने तर लिहिले, ‘आता कोणत्याही गोलंदाजाने याच्यापेक्षा अधिक धावा केल्या, तो पुढील सामन्यातून बाहेर होईल.’
अब जो भी bowler इस से ज़्यादा run बनाएगा, अगले match में बाहर होगा 😜
— Knotty Commander (@knottycommander) December 23, 2022
चाहत्यांनी राहुलला ट्रोल करताना कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला बाहेर बसवल्याचा रागही व्यक्त केला आहे. कुलदीपने पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना 40 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने 8 विकेट्सही घेतल्या होत्या. याच सामन्यात अश्विनेही उत्तम फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली होती. कुलदीपने केलेल्या विशेष कामगिरीने सामनावीर ठरला होता. त्यालाच दुसऱ्या सामन्यात बाकावर बसवल्याने राहुल चाहत्यांच्या टिकांचा निशाना ठरला.
एका नेटकऱ्याने लिहिले, माझा कर्णधार बाद झाला. तुम्ही त्याला समर्थन दर्शवतच नाही. तो केवळ 90 धावांनी शतक करण्यास मुकला.
https://twitter.com/DalalHonSanjuKa/status/1606159582794960896?s=20&t=hjxhZRfb1JkXvmyrwFXIJA
राहुल उशिरा भारताच्या संघात आला. त्याने 2014मध्ये भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये झालेल्या त्या सामन्यात तो 3 आणि एक धाव करत बाद झाला होता. आतापर्यंत त्याने 45 कसोटी सामन्यातील 77 डावांमध्ये खेळताना 7 शतके केली आहेत. त्याचे शेवटचे कसोटी शतक मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात आले होते.
या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 227 धावसंख्येवरच गुंडाळला गेला. तर भारताच्या पहिल्या डावाची स्थिती 3 बाद 86 धावा अशी झाली आहे. Users Troll KL Rahul becuuse of poor performance in batting BANvIND 2nd Test
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Auction 2023: मागील लिलावापेक्षा यंदाच्या खर्चात 350 कोटी रुपयांची कपात! जाणून घ्या कारण
BANvIND: दुसऱ्या दिवशीच्या सुरूवातीलाच भारताला दोन धक्के, राहुल-गिल स्वस्तात ‘आऊट’