भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज एमएस धोनी सध्या त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) प्रतिनिधित्व करत आहे. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा देखील सीएसकेसाठी खेळत आहे. संघातील इतर खेळाडू युवा असल्यामुळे ते सर्वजन धोनीला ‘माही भाई’ या नावाने आवाज देतात, परंत उथप्पा आणि धोनीची मैत्री अनेक वर्षे जुनी आहे. अशात धोनीला कोणत्या नावाने आवाज द्यावा, अशा प्रश्न उथप्पापुढे पडला होता. फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसोबत बोलताना उथप्पाने हा संपूर्ण किस्सा उघड केला.
संघात इतर युवा खेळाडूंप्रमाणे रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याच्यासाठी धोनीला ‘माही भाई’ म्हणणे थोडे कठीणचं होते. नंतर स्वतः एमएस धोनीने उथप्पाला या पेचावर पर्याय सांगितला. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) सोबत त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना उथप्पा म्हणाला की, “आज माझ्यासाठी त्याला माही भाई म्हणणे कठीण आहे. कारण जेव्हापासून मी त्याला ओळखतो, तेव्हापासून तो ‘माही, एमएस’ होता. मी जवळपास १०-१२ किंवा १३ वर्षांनंतर त्याच्यासोबत खेळलो. मग मी विचारले, मी तुला काय म्हणू मित्रा? खरं तर मला माहितीच नव्हतं. मी तुला ‘माही भाई’ म्हणू का? कारण आसपासचे सर्वजन तुला याच नावाने बोलवत आहेत. त्यावर तो म्हणाला, मला एसएस, माही किंवा तुला वाटेल त्या नावाने आवाज दे.”
प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी उथप्पाची पहिल्यांदा धोनीशी भेट करून दिली होती. याविषयी बोलताना उथप्पा म्हणाला की, “मी धोनीशी पहिल्यांदा २००४ मध्ये भेटलो होतो. मी त्यावेळी माझी पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली होती. ही मुंबईत होती. श्रीधरन श्रीराम मालिकेदरम्यान तिथेच होते आणि त्यांच्यासोबत राहणे चांगले होते. ते धोनीच्या खूप जवळचे होते, त्यांचे खूप जमायचे. मी एमएसशी त्यांच्या माध्यमातूनच भेटलो होतो आणि नंतर आम्ही सोबत फिरू लागलो होतो. पण ही भेठ छोटी होती.”
पुढे उथप्पा वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला, जो भारतीय संघासोबतचा त्याचा पहिला विदेश दौरा होता. या दौऱ्यात खऱ्या अर्धातने धोनीसोबत त्यांची चांगली मैत्री झाली होती. या दौऱ्यात उथप्पा एमएस धोनीसह, इरफान पठाण, आरपी सिंग आणि पीयूश चावला यांचाही चांगला मित्र बनला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
लखनऊविरुद्ध वॉर्नरला संधी देत कर्णधार पंत स्वत:च्याच पायावर मारणार धोंडा! आकडे आहेत विरोधात
भाई-भाई! दीपक हुड्डाने बदलले सूर; कृणाल पंड्याबद्दल म्हणाला, ‘तो माझा भाऊ आहे’