• About Us
  • Privacy Policy
मंगळवार, सप्टेंबर 26, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

गोवा चॅलेंजर्सचा UTT सीझन 4 मध्ये रोमहर्षक विजय

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
जुलै 15, 2023
in अन्य खेळ, टॉप बातम्या
0
गोवा चॅलेंजर्सचा UTT  सीझन 4 मध्ये रोमहर्षक विजय

Photo Courtesy: Twitter/UTT


पुणे, १५ जुलै २०२३ :* हरमित देसाईने अटीतटीच्या सामन्यात साथियन ज्ञानसेकरनचा पराभव करून गोवा चॅलेंजर्स संघाला इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये दबंग दिल्ली टीटीसी विरुद्ध पहिला विजय मिळवून दिला. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ही लीग सुरू आहे.

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने निरज बजाज आणि विटा दाणी यांनी प्रमोट केलेली फ्रँचायझी-आधारित लीग २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून भारतीय टेबल टेनिससाठी गेम चेंजर आहे.

आदरणीय केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी गोवा चॅलेंजर्स आणि दबंग दिल्ली टीटीसी यांच्यातील रोमहर्षक सामना पाहिला. अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ हा DafaNews द्वारे समर्थित आहे. गोवा चॅलेंजर्सने १०-५ अशा फरकाने दबंग दिल्ली टीटीसीवर विजय मिळवला.

गोवा चॅलेंजर्सच्या या रोमहर्षक विजयाचा नायक हरमित ठरला. त्याने चौथ्या लढतीत ( पुरुष एकेरी) साथियनविरुद्ध ३-० असा विजय मिळवला आणि त्यानंतर मिश्र दुहेरीत सुथासिनी सवेत्तबटसोबत विजय मिळवताना संघाला ८-४ अशी आघाडी घेऊन दिली.

हरमित आणि साथियन या दोघांनी आक्रमक खेळ करताना एकमेकांना कडवी टक्कर दिली. त्यांनी फोअरहँडने मारलेले फटके चाहत्यांची उत्सुकता वाढवणारे ठरले आणि त्यांच्याकडून दोन्ही खेळाडूंना दाद मिळाली. हरमितने पहिला गेम ११-८ असा जिंकला आणि दुसऱ्या गेमममध्ये ११-५ अशी बाजी मारली. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीसतोड टक्कर दिली, परंतु हाही गेम हरमितच्या बाजूने ११-१० असा सुटला.

हरमितच्या या अविश्वसनीय विजयानंतर सुथासिनीने महिला एकेरीत २-१ ( ११-७, ११-९, ८-११) अशा फरकाने बार्बोरा बालाझोव्हाचा पराभव केला आणि गोवा चॅलेंजर्सची गुणतालिकेतील पकड मजबूत केली.

त्याआधी गोवा चॅलेंजर्सच्या अलव्हारो रोब्लेसने पुरुष एकेरीत २-१ अशा फरकाने जॉन पेर्सनचा पराभव केला. रॉब्लेसने मजबूत बचाव ठेवताना पेर्सनचे आक्रमण अपयशी केले. त्यानंतर त्याने आक्रमण व बचाव याचा संतुलित खेळ करून पहिला गेम ११-९ असा जिंकला, परंतु स्वीडिश खेळाडूने पुनरागमन करून दुसऱ्या गेममध्ये ११-८ अशी बाजी मारली. शेवटच्या सामन्यात रॉब्लेसने कोणतीच संधी न देता ११-४ असा विजय नोंदवला.

महिला एकेरीच्या आणखी एका सामन्यात दबंग दिल्ली टीटीसीच्या श्रीजा अकुलाने २-१ अशा फरकाने रिथ तेनिसनचा पराभव केला. रिथने सुरुवातीला झटपट गुणांची कमाई केली, परंतु श्रीजाने पुनरागमन करताना पहिला गेम ११-७ असा नावावर केला. गोवाच्या या खेळाडूने आक्रमक खेळ करताना दुसऱ्या गेम ११-६ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि श्रीजाने ११-९ अशी बाजी मारली. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी ३-३ असे गुण झाले होते.

मिश्र दुहेरीत हरमित व सवेत्तबट या गोवाच्या खेळाडूंनी दबंग दिल्लीच्या साथियन व बालाझोव्हा या जोडीवर २-१ असा विजय मिळवून संघाला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. हरमित व सुथासिनी यांनी पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ करून ११-२ अशी बाजी मारली. दुसरा गेमही गोवा फ्रँचायझीच्या नावावर राहिला, परंतु साथियन व बार्बोरा यांनी तिसऱ्या गेममध्ये पुनरागमन केले अन् ११-४ असा विजय मिळवला.


Previous Post

ठरलं एकदाचं! ‘या’ दिवशी पुन्हा मैदानावर पाऊल ठेवणार बुमराह, तर श्रेयसला

Next Post

कसोटी विजयानंतर रोहितला अनारकलीचा फोन; नेटकरी म्हणाले, ‘आता वडापावही…’

Next Post
Rohit-Sharma

कसोटी विजयानंतर रोहितला अनारकलीचा फोन; नेटकरी म्हणाले, 'आता वडापावही...'

टाॅप बातम्या

  • अभिमानास्पद! चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताने घोडेस्वारीत जिंकलं गोल्ड मेडल
  • विश्चचषक ट्रॉफीच्या मरवणुकीत पावसाची हजेरी, पुण्यातील ‘FC Road’वर चाहत्यांचा झिंगाट डान्स
  • विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघ भारतात दाखल! राशिद खानसह सर्वांचे सुटा-बुटातील फोटो पाहाच
  • वर्ल्डकप काऊंटडाऊन: विश्वचषक इतिहासात ‘अशी’ बॉलिंग फिगर टाकायची डेरिंग त्याच्याशिवाय कुणीच केली नाही, वाचाच
  • वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय
  • ‘जेव्हा मी 2011 वर्ल्डकप संघातून ड्रॉप झालेलो…’, वेदनादायी आठवणींना उजाळा देताता स्पष्टच बोलला रोहित
  • ‘धोनीने एकट्याने वर्ल्डकप…’, डिविलियर्सचं हैराण करणारं विधान वेधतंय सर्वांच लक्ष
  • सजवलेल्या बसमधून निघणार World Cup Trophyची पुण्यात भव्य रॅली; कधी, कुठे आणि कशी जाणार? घ्या जाणून
  • बोंबला! पोलिसांनी कापलं बाबर आझमचं चलन, ठोठावला दंड; पाकिस्तानी कर्णधाराने काय चूक केली वाचाच
  • ‘मग त्यांच्याशी भांडावे का?’, भारताविरुद्ध आक्रमकता न दाखवण्याच्या प्रश्नावर PAK गोलंदाजाचे लक्षवेधी उत्तर
  • ‘विराटसाठी ही वेळ खराब नसेल…’, कोहलीने कधी घ्यावी Retirement? एबी डिविलियर्सने स्पष्टच सांगितले
  • Asian Gamesमध्ये भारतीय हॉकी संघाचा बोलबाला! सिंगापूरचा 16-1ने दारुण पराभव; हरमनप्रीत चमकला
  • न भूतो…! धोनी-कोहलीसारख्या भल्याभल्या कर्णधारांना न जमलेला पराक्रम हरमनप्रीतने केला, बनली दिग्गज Captain
  • लॅबुशेनचा त्रिफळा उडवणारा अश्विनचा ‘तो’ चेंडू चर्चेत कशामुळे? फिरकीपटूने स्वतः सांगितली रणनीती
  • नोव्हेंबरमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी 2023-24 चा थरार
  • Asian Games । गोल्ड जिंकल्यानंतर स्मृती मंधानाला आली नीरज चोप्राची आठवण, वाचा काय म्हणाली स्टार फलंदाज
  • वर्ल्डकपसाठी दिग्गजाला कोच म्हणून आणणार इंग्लंड? स्वतः बेन स्टोक्सने दिले संकेत
  • पैसाच पैसा! WPL मधून बीसीसीआयने केली चिक्कार कमाई, आकडा पाहून…
  • World Cup 2023 । पीसीबीचा संयम सुटला! भारताचा व्हिजा मिळत नसल्याने घेतली आयसीसीकडे धाव
  • पाकिस्तान संघाचा पीसीबीला धक्का! विश्वचषकात स्पॉन्सर कंपन्यांना बॉयकॉट करण्याची शक्यता
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In