fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी व एमसीए 1, तर व्हेरॉक व पूना क्लब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, एमसीए 1, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी व पूना क्लब या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना  येथील क्रिकेट मैदानावर उद्या(दि.25 सप्टेंबर रोजी)हे उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.

अ गटातून व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने 5 गुणांसह(0.3444रनरेट), एमसीए 1संघाने 4गुणांसह(0.2596रनरेट), तर ब गटातून यजमान पीवायसी हिंदू जिमखानाने 5गुणांसह(0.0665), पूना क्लब संघाने  3 गुणांसह(0.0177)उपांत्य फेरी गाठली.

उद्या (दि.25 सप्टेंबर रोजी) होणाऱ्या उपांत्य फेरीतील पहिला सामना पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर पीवायसी हिंदू जिमखाना व एमसीए 1 यांच्यात, तर दुसरी लढत डेक्कन जिमखाना येथे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी व पूना क्लब यांच्यात होणार आहे.

You might also like