fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टेनिस 2020 स्पर्धेत वेद मोघे, देवांशी प्रभुदेसाई, अभिराम निलाखे, सिमरन छेत्री यांना विजेतेपद

पुणे। नगरसेवक किरण दगडे पाटील व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व चौथ्या केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2020 स्पर्धेत वेद मोघे, अभिराम निलाखे, देवांशी प्रभुदेसाई आणि सिमरन छेत्री या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

किरण दगडे टेनिस अकादमी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकीत वेद मोघे याने अर्जुन वेल्लूरीचा 4-2, 1-4, 4-0 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित देवांशी प्रभुदेसाई हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तिसऱ्या मानांकित दुर्गा बिराजदारचा 4-0, 4-0 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित अभिराम निलाखे याने सातव्या मानांकित अवनीश चाफळेचा 4-2, 4-0 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अव्वल मानांकित सिमरन छेत्री हिने दुसऱ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईचा 4-1, 4-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सिमरन डीपीएस शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून महाराष्ट्रीय मंडळ येथे प्रशिक्षक धरणीधर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
12 वर्षाखालील मुले:
उपांत्य फेरी:

अर्जुन वेल्लूरी वि.वि.अथर्व येलभर 7-5;

वेद मोघे वि.वि.समीहन देशमुख(2)7-4;

अंतिम फेरी:वेद मोघे वि.वि. अर्जुन वेल्लूरी 4-2, 1-4, 4-0;

12 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:

देवांशी प्रभुदेसाई(1) वि.वि. धुर्वा माने(4)7-0;

दुर्गा बिराजदार(3) वि.वि.अद्विका मिश्रा(2)7-2;

अंतिम फेरी: देवांशी प्रभुदेसाई(1) वि.वि. दुर्गा बिराजदार(3) 4-0, 4-0;

14 वर्षाखालील मुले:
उपांत्य फेरी:

अवनीश चाफळे(7) वि.वि.अर्जुन कीर्तने(8) 7-2;

अभिराम निलाखे(2) वि.वि.केयूर म्हेत्रे(3)7-6(6);

अंतिम फेरी:अभिराम निलाखे(2) वि.वि. अवनीश चाफळे(7) 4-2, 4-0;

14 वर्षाखालील मुली:
उपांत्य फेरी:

सिमरन छेत्री(1) वि.वि.रितिका मोरे 7-3;

देवांशी प्रभुदेसाई(2) पुढे चाल वि.क्षीरीन वाकलकर(3)

अंतिम फेरी: सिमरन छेत्री(1) वि.वि. देवांशी प्रभुदेसाई(2) 4-1, 4-0.

You might also like