Loading...

पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज २०१९ स्पर्धेत वेदांत खानवलकरचा मानांकीत खेळाडूवर विजय

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगर मानांकीत वेदांत खानवलकरने सहाव्या मानांकीत स्वरनीम येवलेकरचा 5-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

अक्षय शहाणे टेनिस अकादमी, भुगाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुस-या मानांकीत नमिश हुडने विहान तिवारीचा 5-1 असा पराभव केला. सनत कडलेने सक्षम भन्सालीचा तर शौनक रणपीसेने अथर्व येलभरचा 5-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात अव्वल मानांकीत आरोही देशमुखने काव्या पांडेचा 5-3 असा तर दुस-या मानांकीत अस्मी टिळेकरने हर्षिता रत्नोजीचा 5-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकीत काव्या तुपेने सारा फेंगसेचा 5-2 तर वंशिका अगरवालने श्रीया होनकरचा 5-4(2) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

8 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्यपुर्व फेरीत दुस-या मानांकीत क्रिशय तावडेने पाचव्या मानांकीत निल देसाईचा 5-1 असा तर तिस-या मानांकीत स्मित उंद्रेने जय थापरचा 5-4(2) असा पराभव केला. चौथ्या मानांकीत युग उपरीकरने सहाव्या मानांकीत वेदान जोशीचा 5-4(4) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. 8 वर्षाखालील मुलींच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकीत श्रृष्टी सिर्यवंशीने तिस-या मानांकीत स्वरा जावळेचा 6-3 असा तर दुस-या मानांकीत श्रावी देवरेने सारा फेंगसेचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी:

10 वर्षाखालील मुले:
वेदांत खानवलकर वि.वि स्वरनीम येवलेकर(6) 5-3
सनत कडले वि.वि सक्षम भन्साली 5-3
शौनक रणपीसे वि.वि अथर्व येलभर 5-3
नमिश हुड (2) वि.वि विहान तिवारी 5-1

उपांत्यपुर्व फेरी:
10 वर्षाखालील मुली:
आरोही देशमुख(1) वि.वि काव्या पांडे 5-3
काव्या तुपे(5) वि.वि सारा फेंगसे 5-2
वंशिका अगरवाल वि.वि श्रीया होनकर 5-4(2)
अस्मी टिळेकर(2) वि.वि हर्षिता रत्नोजी 5-0

उपांत्यपुर्व फेरी:
8 वर्षाखालील मुले:
निल बोंद्रे पुढे चाल वि सर्वज्ञ सरोदे(7)
युग उपरीकर(4) वि.वि वेदान जोशी (6) 5-4(4)
स्मित उंद्रे(3) वि.वि जय थापर 5-4(2)
क्रिशय तावडे(2) वि.वि निल देसाई (5) 5-1

Loading...

उपांत्य फेरी:
8 वर्षाखालील मुली:
श्रृष्टी सिर्यवंशी(1) वि.वि स्वरा जावळे(3) 6-3
श्रावी देवरे(2) वि.वि सारा फेंगसे 5-0

You might also like
Loading...