Loading...

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाला विजेतेपद

पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात आश्विन गिरमे संघ मालक असलेल्या विपार स्पिडिंग चिताज संघाने विक्रम देशमुख संघ मालक असलेल्या कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा 40-39 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत गतविजेत्या विपार स्पिडिंग चिताज संघाने कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा 40-39 असा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. सामन्यात 8 वर्षाखालील मिश्र गटात चिताजच्या नमिश हुड याने रोअरिंग लायन्सच्या श्रावी देवरेचा 4-0 असा तर, 10 वर्षाखालील मुलांच्या गटात क्रिशांक जोशीने नील केळकरचा 4-2 असा पराभव करत संघाला विजयी सुरुवात करून दिली. 10 वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या हृतिका कापले हिला रोअरिंग लायन्सच्या मृणाल शेळकेने 1-4 असे पराभूत करून ही आघाडी कमी केली.

12 वर्षाखालील मुलांच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या अर्चित धुतने आरुष मिश्राचा 6-1 असा तर मुलींच्या गटात सलोनी परिदाने रोअरिंग लायन्सच्या रितीका मोरेचा 6-1 असा पराभव करत संघाची आघाडी अधिक भक्कम केली. पण 14वर्षाखालील मुलांच्या गटात रोअरिंग लायन्सच्या अनमोल नागपुरेने चिताजच्या ईशान देगमवारचा 6-4 असा तर, मुलींच्या गटात रोअरिंग लायन्सच्या रूमा गाईकैवारी हिने चिताजच्या नाव्या भामिदिप्तीचा 6-0 असा सहज पराभव करून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. त्यानंतर मुलांच्या कुमार दुहेरी गटात ऐतरेत्या राव व राज दर्डा यांनी प्रणव इंगोले व रियान मुजगुले यांचा 6-3 असा तर पराभव करत चिताज संघाला आघाडी मिळवून दिली.

14वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत रोअरिंग लायन्सच्या अर्जुन अभ्यंकर व वेदांत सनस यांनी चिताजच्या अदनान लोखंडवाला व केयुर म्हेत्रे यांचा 6-3 असा तर, 10 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत समीहन देशमुख व आर्यन किर्तने या जोडीने चिताजच्या वेद मोघे व रियान
माळी यांचा 1-4 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत निर्णायक लढतीत रोअरिंग लायन्सच्या डेलिशा रामघट्टा व अथर्व जोशी यांनी विपार स्पिडिंग चिताजच्या विश्वजीत सनस व अलिना शेखच्या यांचा टायब्रेकमध्ये 5(1)-6 असा पराभव केला. पण सामन्यात सुरुवातीपासूनच आघाडीवर असणाऱ्या विपार स्पिडिंग चिताज संघाने आपली आघाडी कायम राखत केवळ एका गुणाच्या फरकाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

स्पर्धेतील विजेत्या विपार स्पिडिंग चिताज संघाला करंडक व 40,000/-,रुपये, तर उपविजेत्या कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाला करंडक व 25,000/- अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
विपार स्पिडिंग चिताज वि.वि कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स 40-39
एकेरी:
8वर्षाखालील मिश्र गट: नमिश हुड वि.वि श्रावी देवरे 4-0;
10वर्षाखालील मुले: क्रिशांक जोशी वि.वि निल केळकर 4-2 ;
10 वर्षाखालील मुली: हृतिका कापले पराभूत वि मृणाल शेळके 1-4 ;
12 वर्षाखालील मुले: अर्चित धुत वि.वि आरुष मिश्रा 6- 1;
12वर्षाखालील मुली: सलोनी परिदा वि.वि. रितीका मोरे 6-1 ;
14वर्षाखालील मुले: ईशान देगमवार पराभूत वि अनमोल नागपुरे 4-6;
14वर्षाखालील मुली: नाव्या भामिडीपती पराभूत वि रूमा गाईकैवारी 0- 6 ;
कुमार दुहेरी मुले:ऐतरेत्या राव/ राज दर्डा वि.वि प्रणव इंगोले/रियान मुजगुले 6-3 ;
14वर्षाखालील मुले दुहेरी:अदनान लोखंडवाला/केयुर म्हेत्रे पराभूत वि अर्जुन अभ्यंकर/वेदांत सनस 3-6;
10 वर्षाखालील मुले दुहेरी: वेद मोघे/रियान माळी पराभूत वि संमीहन देशमुख/आर्यन किर्तने 1-4;
मिश्र दुहेरी: विश्वजीत सनस/अलिना शेखपराभूत वि डेलिशा रामघट्टा/अथर्व जोशी 5(1)-6).

You might also like
Loading...