नवी दिल्ली। वरिष्ठ पत्रकार आणि माजी क्रिकेट समालोचक किशोर भिमाणी यांचे गुरुवारी (१५ ऑक्टोबर) निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांना सर्व क्षेत्रांतून श्रद्धांजली वाहण्यात आली. यादरम्यान त्यांच्या क्रिकेट आणि मीडियातील योगदानाची प्रशंसा करण्यात आली.
भिमाणी यांना २०१३ साली मीडिया आणि समालोचन क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार त्यांना भारतीय संघाचे माजी अष्टपैलू आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते देण्यात आला होता.
त्यावेळी शास्त्रींनी भिमाणीबद्दल वक्तव्य केले होते. “मला आठवते की, त्यांचे समालोचन किती स्पष्ट होते. त्यांनी एकदा ईडन गार्डन्समध्ये एका कसोटी सामन्यादरम्यान क्रीझवर खराब शॉट खेळल्यामुळे मला फटकारले होते. आणि त्याच संध्याकाळी आम्ही त्यांच्या घरी ड्रिंक्स घेतले होते. आमच्यातील संबंध आजपर्यंत चांगले आहेत,” असे पुरस्कार समारंभादरम्यान शास्त्रींनी म्हटले होते.
भिमाणी यांच्या निधनाने क्रिकेट जगतातील एक मोठा तारा हरवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदींनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
RIP Kishore Bhimani..he was one of the good Old Fashioned Crkt writer who took Crkt writings like a player who takes to playing…Condolences to his Spouse Rita & Son Gautam.. GodBless All Always.. Fondly.
— Bishan Bedi (@BishanBedi) October 15, 2020
त्यांनी ट्विट केले की, “RIP किशोर भिमाणी. ते जुन्या काळातील क्रिकेट लेखक होते. ज्यांनी क्रिकेट लेखनाला एका खेळाडूप्रमाणे घेतले. त्यांची पत्नी रीटा आणि मुलगा गौतमबद्दल संवेदना. देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहो.”
Kishor Bhimani was much my senior in the profession, a shoulder to lean on when I was starting out, and a lifelong friend thereafter. Fine writer on myriad subjects, great raconteur, man of wit and wisdom, and a bon vivant. Indian journalism has lost a doyen. RIP
— Cricketwallah (@cricketwallah) October 15, 2020
Sad news to share.. one of the great characters of cricket commentary, an encyclopaedia on the sport, unafraid to voice a sharp opinion and a true cricket enthusiast and aficionado.. Kishore Bhimani has passed away.. Will be much missed RIP
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) October 15, 2020
इतर व्यक्तींनीही भिमाणी यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेट जगत शोकसागरात.! तब्बल ४६६ विकेट्स घेणाऱ्या महान क्रिकेटरचा मृत्यू
-क्रिडाविश्वासाठी धक्कादायक बातमी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचे दुःखद निधन
-क्रिकेट जगतावर शोककळा, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूचे मुंबईत निधन
ट्रेंडिंग लेख-
-२०१० प्रमाणेच चेन्नई यंदाही होणार चॅम्पियन? नक्की काय आहेत कारणे
-मराठी मनाचा अभिमान.! नाव ‘तांबे’ पण खेळाडू मात्र सोन्यासारखा
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार