इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात देखील पाकिस्तान संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना 3 सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशी पिछाडी स्विकारावी लागली आहे. तसेच मालिकाही गमवावी लागली आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तान संघावर टीकेचा वर्षाव होत आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना अर्धा तास उशिरा सुरू झाला होता. सामना सुरू झाल्यानंतर पाकिस्तान संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने उत्कृष्ट गोलंदाजी करत पहिल्या पाच षटकांमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. परंतु त्यानंतर इंग्लंड संघातील फिलिप सॉल्ट (60) आणि विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य जेम्स व्हिन्स (56) यांच्या 97 धावांच्या भागीदारीने इंग्लंड संघाचा डाव सावरला.
पाकिस्तानचे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव टाकण्यात अपयशी देखील ठरले. शेवटी इंग्लंडने धावफलिकेवर 247 धावांचा आकडा गाठला. तर पाकिस्तान संघाचा डाव इंग्लंडच्या गोलंदाजांनी 195 धावांवर गुंडाळण्यात यश मिळवले आणि या सामन्यात इंग्लंड संघाने 52 धावांनी विजय मिळवला.
इंग्लंड संघाविरुद्ध पाकिस्तान संघाचे खराब प्रदर्शन पाहून माजी क्रिकेटपटूंनी बाबर आजमवर आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. शोएब अख्तरने बाबर आजम शिवाय शाहिद आफ्रिदीचा होणारा जावई शाहीन शाह आफ्रिदी याच्यावरही राग व्यक्त केला. अख्तरने शाहिन आफ्रिदीच्या सामन्यादरम्यानच्या सेलिब्रेशनसाठी त्याच्यावर टीका करत त्याला सांगितले की उडणारी चुंबन आणि मिठी देण्याऐवजी आणखी विकेट घेऊन दाखव.
शोएब अख्तर म्हणाला की, “शाहीन आफ्रिदीला विकेट घेण्यापेक्षा उडणारी चुंबन देण्यास आवडते. कमीतकमी पाच विकेट घ्या किंवा फलंदाजीमध्ये जास्त धावा करा. यानंतर मिठी आणि उडणारी चुंबनेही द्या. फक्त एक विकेट घेतल्यानंतर हे करण्यात काय अर्थ आहे? इंग्लंड संघाने मालिकेपूर्वी फक्त अडीच दिवस आधी तयारी केली होती. पण तरीही त्यांनी हा सामना जिंकला आणि तुम्ही 30 दिवसांपूर्वी पासून सराव करत आहात. आपण इंग्लंड अकादमी संघाकडून पराभूत झाला आहे.”
या मालिकेला सुरुवात होण्याच्या 2 दिवसापूर्वी इंग्लंडच्या मुख्य एकदिवसीय संघातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाली. ज्यामुळे इंग्लंडचा मुख्य एकदिवसीय संघातील सर्व खेळाडूंना आयसोलेट व्हावे लागले. त्यामुळे एका रात्रीत इंग्लंड क्रिकेट बोर्डाला एक नवा संघ उभा करावा लागला. इंग्लंडने या नव्या खेळाडूंच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अनुभवी बेन स्टोक्सवर टाकली.
दुसर्या एकदिवसीय सामन्यात शाहीन आफ्रिदीने 8 षटकांत 37 धावा देत एक बळी घेतला होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने इंग्लंड संघाची एकमेव विकेट घेतली होती. पाकिस्तानने पहिला सामना 9 विकेटने गमावला होता. पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध प्रत्येक विभाहात संघर्ष करीत आहे. तिसर्या एकदिवसीय सामन्यामध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मंगळवार (13 जुलै) रोजी खेळला जाणार आहे.
एकदिवसीय मालिकेनंतर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 16 जुलैपासून तीन सामन्यांची टी20 मालिका देखील खेळली जाणार आहे. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील सामने अनुक्रमे 16 जुलै, 18 जुलै आणि 20 जुलै रोजी खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सूर्यकुमार की श्रेयस, टी२० विश्वचषकासाठी भारत चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवणार? दिग्गजाने दिले उत्तर
विक्रमवीर अश्विन! पहिल्याच काउंटी सामन्यात केला विक्रम, गेल्या ११ वर्षांत कोणालाही नाही जमला
एका टी२०त ४ रनआऊट, भारतीय महिलांचे लाजबाव क्षेत्ररक्षण; पण खरे श्रेय द्रविडच्या खास व्यक्तीला