ऑलिम्पिकनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी क्रीडा प्रकारांची स्पर्धा असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया येथे होणार होती. मात्र, स्पर्धेसाठी आता तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना आता आयोजकांनी आपण स्पर्धा भरवण्यासाठी समर्थ नसल्याचे घोषित केले आहे. विक्टोरिया राज्याचे प्रीमियर डॅनियल ऍण्ड्रू यांनी हा निर्णय सार्वजनिक केला.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात विक्टोरिया राज्याला स्पर्धेचे आयोजन करण्याचे यजमानपद दिले गेले होते. त्यानंतर राज्याने काढलेल्या अंदाजपत्रकानुसार स्पर्धेची तयारी सुरू होती. मात्र, त्यानंतर आता स्पर्धेचे पुन्हा एकदा अंदाजपत्रक काढले असून, त्यातील बजेटनुसार ही स्पर्धा आयोजित केल्यास राज्याला मोठा तोटा होऊ शकतो असे डॅनियल यांनी सांगितले.
डॅनियल म्हणाले,
“आम्ही अत्यंत जड अंतकरणाने हा निर्णय घेत आहोत की, आम्ही 2026 राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवणार नाही. आम्ही राष्ट्रपती समितीला हा निर्णय कळवला असून, मोठ्या बैठकीनंतर या संपूर्ण निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो.”
डॅनियल यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पर्धेला अद्याप 973 दिवस शिल्लक आहेत. आयोजकांनी सुरुवातीला जे बजेट तयार केले होते त्यानुसार अंदाजीत खर्च हा 2.6 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतका होत होता. मात्र, आता हाच खर्च 6 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतका होईल. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याने, विक्टोरिया शासनाने आयोजन करण्यास नकार दिला.
विक्टोरियाने ही स्पर्धा आयोजित न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ही स्पर्धा होणार का याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. ही स्पर्धा आता एक वर्षानंतर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या स्पर्धांच्या अनुभवावरून लंडन व नवी दिल्ली ही शहरे यजमानपदाची मागणी करू शकतात. या दोन्ही शहरांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आवश्यक अशी तयारी दिसून येते.
(Victoria Cancel Hosting 2026 Commenwelth Games New Delhi In Race Now)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान वनडे संघाला मोठी विश्रांती, 2023 विश्वचषकानंतर खेळाडू एक वर्षांच्या सुट्टीवर
वेस्ट इंडीजसाठी युवा स्पिनर करणार कसोटी पदार्पण! दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा