क्रिडाजगतात चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंचे लक्ष वेधण्यासाठी काही ना काही गोष्टी करत असतात. अशात आपल्या आवडच्या खेळाडूकडून बॅट, जर्सी किंवा आणखी काही मिळाले तर त्या चाहत्याला आनंद नक्कीच होईल. याचाच प्रत्यय ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUSvENG) यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात आला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याचे चाहते जगभरात आहे.ऑस्ट्रेलियातही त्याला अनेकजण हिरोच मानतात.
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलिया 2-0 अशी आघाडीवर आहे. यातील तिसरा सामना मंगळवारी (22 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात डेविड वॉर्नर (David Warner) याने 106 धावांची खेळी केली. जेव्हा तो बाद झाल्यावर तंबूत परतत होता, तेव्हा त्याने एक अशी हालचाल केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वॉर्नरने तब्बल 1043 दिवसांनंतर ऑस्ट्रेलियासाठी शतक केले आहे. तो बाद होत परत येत होता तेव्हा पवेलियनपाशी अनेकजण उभे होते. अशातच त्याने त्याचे ग्लोव्ह्ज एका लहान मुलाला दिले. एकप्रकारे त्याने शतकाचा आनंदच व्यक्त केल्यासारखे वाटले. त्या मुलालाही ग्लोव्ह्ज मिळाल्याचा इतका आनंद झाला की त्याने पळत जाऊन ते ग्लोव्ह्ज आपल्या आईला आणि भावाला दाखवले. त्या दोघांच्याही रिऍक्शन पाहण्यासारख्या होत्या. याच घटनेचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका माध्याने शेयर केला असून तो व्हायरल होत आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. तेव्हा वॉर्नरने ट्रेविड हेड याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 269 धावांची भागीदारी रचली. यावेळी हेड 130 चेंडूत 152 धावा करत बाद झाला.
Great gesture from David Warner, champion. pic.twitter.com/yzUXBNO9XB
— Johns. (@CricCrazyJohns) November 22, 2022
या मालिकेत हेड, वॉर्नर चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. वॉर्नरने तीन डावांमध्ये 69.33च्या सरासरीने 208 धावा केल्या. ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. या सामन्यात त्याने शतक करताच तो ऑस्ट्रेलियाकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (19) करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. या यादीत रिकी पॉंटिंग 29 शतके करत अव्वल स्थानावर आहे.
नुकतेच वॉर्नरवरून कायमस्वरूपी कर्णधार पदाचे निलंबन मागे घेण्यात आले. Video: David Warner gifts gloves to young fan after scoring century after 1043 days
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जो विक्रम आतापर्यंत कधीही बनला नाही, तो अर्शदीप अन् सिराज जोडगोळीने रचला; एकदा वाचाच
एक हजार दिंवसांची वाट पाहिल्यानंतर वॉर्नरच्या नावावर मोठा विक्रम, दिग्गज मार्क वॉ यांना नुकसान






