आयपीएल 2021 मधील 12 व्या सामन्यात सोमवार (19 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 45 धावांनी पराभव केला. या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका वेगळ्याच अंदाजात दिसला. त्यामध्ये फलंदाजी करताना ज्याप्रकारे तो डाईव्ह मारून बाद होण्यापासून वाचला ते पाहणे खरेच खूप आश्चर्यकारक होते. त्याबरोबरच त्याने गोलंदाजीबाबत रविंद्र जडेजाबद्दल केलेली भविष्यवाणीही जडेजाने खरी करून दाखवली.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात सीएसकेचा कर्णधार धोनी जोस बटलर बाद होण्यापूर्वी भाकीत करताना दिसत आहे. त्यामध्ये तो जडेजाला चेंडू कोरडा आहे, त्यामुळे तो वळण घेऊ शकतो असे म्हणाला होता. त्याच्या पुढच्या चेंडूवर जडेजाने गोलंदाजी करताना फिरकी चेंडू टाकत जोस बटलरला त्रिफळाचीत करून संघाला मोठे यश मिळवून दिले.
ही घटना 12 व्या षटकातील पहिल्या चेंडूची आहे. त्यावेळी जोस बटलर 5 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 49 धावांवर फलंदाजी करत होता. परंतु त्यानंतर जडेजाने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून बाद केले.
धोनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत बर्याच वेळा असे करताना दिसला आहे. त्याने आपल्या लाईव्ह सामन्यात आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवत खूप वेळा युझवेंद्र चहल, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बळी मिळवून दिले आहेत.
https://twitter.com/KartikS25864857/status/1384198007961231362?s=20
जोस बटलर बाद झाल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा डाव पुर्णपणे कोसळला. जेव्हा बटलर बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 3 बाद 87 धावा होती. परंतु तो बाद झाल्यानंतर राजस्थानला निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 143 धावा करता आल्या. चेन्नईकडून मोईन अलीने तीन, जडेजा आणि सॅम करन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तत्पुर्वी सीएसकेनेे प्रथम फलंदाजी करताना 188 धावा केल्या होत्या. यामध्ये डु प्लेसिसने 33, मोईन अलीने 26 आणि रायुडूने 27 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पंड्या फॅमिली’चा स्वॅगचं निराळा, झक्कास डान्सने लाखो चाहत्यांना लावलं वेड; एकदा व्हिडिओ बघाच
गेल, कोहली किंवा धोनी नव्हे तर ‘हे’ आयपीएलचे सर्वात खतरनाक फलंदाज, फिरकीपटू कुलदीपने सांगितली नावं
चेन्नई टू मुंबई, आरसीबीचा कर्णधार कोहली पत्नी अन् लेकीसह मुंबईत दाखल; विमानतळावरील Video व्हायरल