---Advertisement---

चित्त्याची चपळाई दाखवत भरतने करून दिली धोनीची आठवण; करिअरची पहिली स्टंपिंग होतेय जोरदार व्हायरल

KS-Bharat
---Advertisement---

जेव्हाही कसोटी क्रिकेटचा विषय निघतो, तेव्हा फलंदाज- गोलंदाजासोबतच यष्टीरक्षकाचे महत्त्वही खूपच वाढते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ईशान किशन, संजू सॅमसन यांच्यासह असे यष्टीरक्षक फलंदाज आहेत, जे सातत्याने चर्चेत असतात. मात्र, केएस भरत हादेखील शानदार यष्टीरक्षक म्हणून पुढे आला आहे. भरतपूर्वी वृद्धिमान साहा यानेही कसोटीत शानदार यष्टीरक्षण केले आहे. तसेच, आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भरतने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच अशी स्टंपिंग केली, ज्याने फलंदाज मार्नस लॅब्युशेन हाच नाही, तर पाहणाऱ्या प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या.

झाले असे की, मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) हा 36वे षटक टाकत असलेल्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या पाचव्या चेंडूवर पुढे येऊन खेळला. मात्र, त्याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला नाही आणि तो यष्टीरक्षण करत असलेल्या केएस भरत (KS Bharat) याच्याकडे गेला. यावेळी भरतने चेंडू हातात येताच स्टंप उडवला. यावेळी केएस भरत यानेदेखील एमएस धोनी (MS Dhoni) याच्याप्रमाणेच यष्टीरक्षण केल्याचे चाहते म्हणत आहेत. भरतने ज्याप्रकारे यष्टीरक्षण केले, त्याप्रकारे खूप कमी यष्टीरक्षक असे करताना दिसतात.

धोनीदेखील फिरकी चेंडूवर फलंदाजाला यष्टीचीत करण्यासाठी हात थोडासाच मागे घेऊन जायचा. प्रशिक्षणामध्ये हेच सांगितले जाते की, आधी फिरकी चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यासाठी हात मागे घेऊन जावा आणि त्यानंतर बेल्स पाडा. मात्र, धोनी आणि भरत यांच्या तंत्राचा हा फायदा आहे की, यामुळे क्षेत्ररक्षकाला बेल्स पाडण्यासाठी आणखी काही मायक्रो सेकंद मिळतात. त्यामुळे फलंदाज जरासादेखील क्रीजच्या बाहेर गेला, तर क्षेत्ररक्षक त्याची विकेट घेतल्याशिवाय सोडत नाहीत. अशाप्रकारच्या यष्टीरक्षणासाठी धोनी विशेष प्रसिद्ध होता.

यावेळी लॅब्युशेन हा अर्धशतक करण्यापासून 1 धाव दूर होता, तेव्हाच जडेजाच्या चेंडूवर भरतने त्याला यष्टीचीत केले. त्यामुळे तोदेखील हैराण झाला. यासह पहिला कसोटीत खेळत असलेल्या भरतचा आनंद कारकीर्दीतील पहिली विकेट घेतल्यानंतर पाहण्यासारखा होता. भरतने त्याच्या यष्टीरक्षणाने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. त्याच्या यष्टीरक्षणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आता चाहते भरतची तुलना धोनीशी करत आहेत.

https://twitter.com/viratkafann/status/1623576996516188162?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1623576996516188162%7Ctwgr%5Ec1fb08f492e4df1ea77d68719a803e60e4aa35dc%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fvideo-ks-bharat-reminds-ms-dhoni-with-his-debut-test-stump-gone-viral-on-social-media-hindi-3767898

https://twitter.com/SuyashKapoor1/status/1623577766707990530?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1623577766707990530%7Ctwgr%5Ec1fb08f492e4df1ea77d68719a803e60e4aa35dc%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fvideo-ks-bharat-reminds-ms-dhoni-with-his-debut-test-stump-gone-viral-on-social-media-hindi-3767898

पहिल्या दिवशीच ऑस्ट्रेलिया 177 धावांवर बाद
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 63.5 षटकात 177 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेन याने 49 धावा केल्या.   त्याच्याव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ (31) आणि ऍलेक्स कॅरी (36) यांनीही दोन आकडी धावसंख्या केली. भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा (5), आर अश्विन (3), मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दुसरीकडे, फलंदाजी करताना भारताकडून पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा 56 धावांवर खेळतोय, तर केएल राहुल 20 धावा करून बाद झाला. आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 1 विकेट गमावत 77 धावा इतकी आहे. (video wicket keeper ks bharat reminds ms dhoni with his debut test stump gone viral on social media)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाला, ‘मीच कोच आणि कॅप्टनला म्हणालेलो मला टीममधून ड्रॉप करा’
आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूचे झाले नव्हते ‘असे’ पदार्पण, सूर्याने कसोटी कॅप मिळताच रचला विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---