युसूफ पठानने घेतलेल्या अप्रतिम झेलवर राशिद खान म्हणतो….

शुक्रवारी (8 नोव्हेंबर) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेत ‘अ’ गटातील गोवा विरुद्ध बडोदा (Goa vs Baroda) संघात सामना पार पडला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठानने (Yusuf Pathan) हवेत उडी मारत अप्रतिम झेल घेतला. त्याने अप्रतिम झेल घेतल्यामुळे आता त्याची प्रशंसा होत आहे.

युसूफने घेतलेल्या झेलाचा व्हिडिओ त्याचा भाऊ इरफान पठानने (Irfan Pathan) स्वत: च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. “हा एक पक्षी आहे का? नाही, हा तर युसूफ पठान आहे. मस्त झेल लाला. तूला तूझ्या मेहनतीचे फळ मिळत आहे” असे या व्हिडिओला कॅप्शन देत इरफान पठानने आपल्या भावाची प्रशंसा केली आहे.

इरफानच्या या व्हिडिओवर अफगानिस्तानचा (Afghanistan) कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) मजेशीर कमेंट केली आहे. “खूपच मस्त झेल घेतला, ये पठाण के हात हैं ठाकूर(हे पठानचे हात आहेत ठाकूर),” असे राशिदने त्याच्या कमेंटमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर “हो बरोबर म्हणालास, पठाणांच्या हातात जादू आहे,”  असे प्रत्युत्तर इरफानने दिले आहे.

गोव्याचा संघ विजयाच्या अगदी जवळ होता. त्यावेळेस युसूफने सामन्याच्या 19व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हा झेल घेतला होता. परंतु, शेवटी हा सामना गोव्याच्या संघाने 4 विकेट्सने जिंकला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोदा संघाने 149 धावा केल्या होत्या. यामध्ये युसूफ एकही धाव न घेता बाद झाला होता.

गोव्याचा संघ 150 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजीला उतरले. गोव्याकडून फलंदाजी करताना सुयश प्रभूदेसाईने (Suyash Prabhu Desai) 60 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याचबरोबर गोव्याच्या संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला.

बडोदा पुढचा सामना कर्नाटकविरुद्ध (Karnataka) खेळेल.

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.