---Advertisement---

ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची जबाबदारी, ‘असा’ आहे २० जणांचा संघ

On: रविवार, फेब्रुवारी 14, 2021 12:52 AM
---Advertisement---

भारतात सध्या क्रिकेटचा मोसम चालू आहे. एकिकडे भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरु असताना दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाही सुरु आहेत. नुकतीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी पार पडली. आता येत्या २० फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफी ही वनडे स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा २० जणांचा संघ घोषित झाला आहे.

ऋतुराज गायकवाड ‘कर्णधार’
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या ट्विटवर हँडेलवरुन २० जणांचा महाराष्ट्र संघ विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद २४ वर्षीय ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. ऋतुराज मागीलवर्षी इंडियन प्रीमीयर लीगच्या १३ व्या हंगामावेळी प्रकाशझोतात आला होता. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून साखळी फेरीतील शेवटच्या तिन्ही सामन्यात अर्धशतकं झळकावली होती. तसेच चेन्नईला सामने जिंकून दिले होते. तसेच तो नुकताच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्येही खेळला.

महाराष्ट्र संघात केदार जाधवचाही समावेश 
ऋतुराज व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या संघात अनुभवी अष्टपैलू केदार जाधव, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, नौशाद शेख अशा फलंदाजांचा समावेश आहे. तर सत्यजित बछाव, जगदीश झोपे, आशय पालकर, प्रदिप दधे, मनोज इंगेळे आणि मुकेश चौधरी असे गोलंदाज आहे. त्याचबरोबर निखील नाईक आणि विशांत मोरे हे यष्टीरक्षक संघात आहेत.

एलिट डी गटात महाराष्ट्राचा समावेश –
महाराष्ट्राचा विजय हजारे ट्रॉफी २०२१ या स्पर्धेसाठी एलिट डी गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात महाराष्ट्रसह मुंबई, दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पाँडिचेरी या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना २१ फेब्रुवारीला हिमाचल प्रदेशविरुद्ध होणार आहे.

https://twitter.com/MaharashtraCric/status/1360464632800899083

असा आहे महाराष्ट्र संघ – 

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, नौशाद शेख, केदार जाधव, अझीम काझी, निखिल नाईक (यष्टीरक्षक), विशांत मोरे (यष्टीरक्षक), सत्यजित बछाव, आशय पालकर, तरनजित सिंग ढिल्लों, शमशुमा काझी, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, राज्यवर्धन हंगरगेकर, जगदीश झोपे, यश नहार, यश क्षीरसागर, रणजित निकम.

महत्त्वाच्या बातम्या –

पंत-स्टोक्समध्ये जुंपली! पहिल्या दिवसाच्या शेवटी झाली शाब्दिक बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

‘उपकर्णधार’ अजिंक्य रहाणेने सांगितले भारतीय फलंदाजांच्या यशाचे गमक, म्हणाला…

नयन मोंगिया आणि मनोज प्रभाकरची ‘ती’ कुविख्यात भागीदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---