गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रिकेट क्षेत्र ठप्प पडली आहेत. अशात विभिन्न क्रिकेट बोर्ड मिळून येत्या काळात परिस्थिती आटोक्यात आल्यास क्रिकेटचे आयोजन करण्याचा विचार आहेत. मात्र, सेंट विसेंट आणि ग्रेनाडिन्स क्रिकेट असोसिएशनने सर्वांना चकित करणारी घोषणा केली आहे. Vincy Premier T10 League Will Be Held In 22 May To 31 May.
सेंट विसेंट आणि ग्रेनाडिन्स क्रिकेट असोसिएशन (एसव्हीजीसीए) वेस्ट इंडिजच्या पयर्टकांची क्रिकेटमधील रुची पाहता, पहिल्यांदाच टी१० लीगचे आयोजन करणार आहे. या लीगला त्यांनी ‘विंसी प्रिमीयर लीग’ असे नाव दिले आहे. असे करणारे हे जगातील पहिलेच क्रिकेट असोसिएशन असेल. विशेष म्हणजे, ही लीग २२ मे पासून ते ३० मे पर्यंत खेळली जाणार आहे. या लीगमध्ये ६ संघ भाग घेतील आणि कोविड १९चा धोका पाहता या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना चेंडूवर थुंकी लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या लीगमध्ये कॅरेबियन प्रिमीयर लीग आणि इंडियन प्रिमीयर लीगप्रमाणे ७१ खेळाडूंना निवडले जाईल आणि नंतर त्यांना ६ संघात विभागले जाईल.
एसव्हीजीसीएचे अध्यक्ष डॉ. कृष्ण शैलो यांना वाटते की, कोरोना व्हायरसच्या काळात ही लीग प्रत्येक दृष्टीने सुरक्षित असेल. शैलो यांनी म्हटले की, “ही क्रिकेट लीग घेण्याची योग्य वेळ आहे. आम्ही अशाच वेळी ही लीग घेण्याचा विचार करत आहोत. कारण, जगभरातील क्रिकेटप्रेमी क्रिकेट पाहण्यासाठी उत्साहित आहेत. ही जगभरातील क्रिकेट चाहत्यांना एकत्र आणण्याची चांगली संधी आहे. १० दिवसांच्या या लीगमध्ये ३० सामने खेळले जाणार आहेत आणि त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.”
या लीगमध्ये केसरिक विलियम्स (Kessrick Williams), ओबेद मॅककॉय (Obed McCoy) आणि सुनील अंबरीस (Sunil Ambris) यांच्यासारखे खेळाडू भाग घेतील. तसेच, गतवर्षी कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये खेळलेला केरॉन कोटोयसुद्धा या लीगचा भाग असेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
४ असे भारतीय खेळाडू, जे आपल्या शेवटच्या मालिकेत ठरले सुपर फ्लाॅप
आवाज वाढीव डीजे! प्रेक्षकांविना सामने झाले तर मैदानावर थेट स्पिकर्सवर…