पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चमकदार कामगिरी करूनही अंतिम फेरीतून अपात्र ठरलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिचे आज मायदेशात परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विनेशचे सहकारी भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक तिचे स्वागत करण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचले. आपल्या भव्यदिव्य स्वागतासाठी लोकांना जमलेले पाहून विनेशला अश्रू अनावर झाले. विनेशने बजरंग आणि साक्षीला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. यादरम्यान ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगकडून मोठी चूक घडली, ज्यामुळे तो चाहत्यांच्या टीकेचा धनी ठरला आहे.
बजरंग पुनिया तिरंग्याच्या पोस्टरवर उभा राहिला
विनेश फोगटच्या भव्य स्वागतादरम्यान बजरंग ‘तिरंगा’ पोस्टरवर उभा राहिल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, बजरंग पुनिया एका कारच्या बोनेटवर उभा होता. यावर ‘तिरंगा’ पोस्टर चिकटवले होते. या वेळी गर्दी आणि मीडियाला हाताळत असताना बजरंगचा पाय अनवधानाने ‘तिरंगा’ पोस्टरवर पडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्स यावरून कुस्तीपटू बजरंगवर मोठ्या प्रमाणावर टीका करत आहेत.
देश की शान तिरंगे पर पैर रखकर खड़े हैं Bajrang Punia 😡
अब क्या ही बोलें इस पहलवान को 💔 pic.twitter.com/RUmn8hlPR1
— Vaibhav Bhola 🇮🇳 (@VibhuBhola) August 17, 2024
बजरंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भारतीय कुस्तीपटूवर तिरंग्याच्या पोस्टरवर उभे राहून भारतीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे. दाट गर्दीतून गाडी विमानतळाबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तो गर्दी आणि मीडिया हाताळण्यात व्यस्त असल्याने अनवधानाने बजरंगकडून ही चूक घडली. मात्र, नेटकरी यावरुन त्याच्यावर खूप टीका करत आहेत.
Most shameful act by Bajrang Punia ! Bajrang Punia should be ashamed, he is holding the mic of journalists while standing on our national pride Tiranga’….
We know that Bajrang Punia will get Congress ticket anyway, there is no need to do this to impress the Italian family. pic.twitter.com/qGT6KUsZov
— Aditya Kumar Trivedi (@adityasvlogs) August 17, 2024
दरम्यान विनेश फोगट विमानतळावर पोहोचल्यावर देशवासीयांचे प्रेम पाहून ती भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. विनेश फोगट संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. दुर्दैवाने, अंतिम सामन्यापूर्वी, तिचे वजन निर्धारित प्रमाणापेक्षा 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले, ज्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे प्रकरण (CAS) पर्यंत पोहोचल्यावर रौप्य पदक देण्याचे तिचे अपील फेटाळण्यात आले.
हेही वाचा-
पीआर श्रीजेशची जागा कोण घेणार? जाणून घ्या सर्वात मोठे 3 दावेदारॉ
गोलंदाजांसाठी काळचं! पाहा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे घातक फलंदाज
बीसीसीआयचा ग्रीन सिग्नल? आयपीएल 2025 मध्ये धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार!