fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विनेश फोगटने जिंकले कांस्यपदक; टोकियो ऑलिंपिकसाठीही ठरली पात्र

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये बुधवारी कांस्यपदक जिंकले आहे. तिने 53 किलोग्रॅम फ्रिस्टाईल गटात कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात ग्रीसच्या मारिया प्रेव्होलराकीला पराभूत केले आहे.

त्याचबरोबर बुधवारी ती हा सामना खेळण्याआधीच 2020 ला होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरली होती. तिने बुधवारी कांस्यपदकाच्या सामन्याआधी झालेल्या दुसऱ्या रेपेचेज फेरीत अमेरिकेच्या ऍन हिल्डरब्रँड्टचा पराभव करत हा ऑलिंपिक कोटा मिळवला होता.

विनेशने बुधवारी कांस्यपदक जिंकण्याबरोबरच एक खास विक्रमही केला आहे. ती जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी चौथी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.

विनेश या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याच्या शर्यतीतून उपउपांत्यपूर्व अंतिम फेरीचे सामने पराभूत झाल्याने आधीच बाहेर पडली होती. पण विनेशला रेपेचेज फेरीत खेळण्याची संधी मिळाली. तिनेही या संधीचा फायदा घेत रेपचेज फेरीतील सामने जिंकले आणि नंतर कांस्यपदाकाचाही सामना जिंकला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

द. आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

टॉप ५: भारताच्या या खेळाडूंना आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे खास ५ विक्रम करण्याची संधी

या खास यादीत समावेश होण्यासाठी शिखर धवन केवळ ४४ धावा दूर

You might also like