नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू युझवेंद्र चहल यूएईमध्ये आयपीएलच्या तयारीत आहे. परंतु असे असले तरीही तो नेहमीच मजा करण्यात मागे नसतो. आयपीएलमध्ये येण्यापूर्वी, चहलचा प्रसिद्ध डान्सर आणि मॉडेल धनश्री वर्मा हिच्यासह साखरपुडा झाला होता. हे जोडपे सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे आणि या दिवसात ते चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. दरम्यान, गुरुवारी (३ सप्टेंबर) या जोडीने सोशल मीडियावर ‘रसोडेमे कौन था’ हे गाणे असलेला एक व्हिडिओ शेअर केला.
चहलने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये चहल आणि त्याची होणारी पत्नी धनश्री वर्मा गाण्याचा आनंद घेत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ख्रिस गेलने दिली मजेदार प्रतिक्रिया
चाहत्यांकडून या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. चहलच्या या व्हिडिओवर कमेंट करत गेलने विनोद म्हणून लिहिले की, “आतापर्यंत मी तुझ्या व्हिडिओंचा सामना करीत होतो. परंतु आता हे पाहून मी तुझ्या आयजीटीव्ही पेजला तक्रार करणार आहे.”
‘रसोडे मे कौन था’ चे म्युझिकल व्हर्जन झाले व्हायरल
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सोशल मीडियावर आजकाल ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील संवाद ‘रसोडे मे कौन था’ वर बरेच मिम्स बनत आहेत. या यादीमध्ये एक संगीत व्हर्जन मिम जोरदार व्हायरल झाले आहे, ज्यावर लोक त्यांचे स्वतः चे व्हिडिओ अपलोड करताना दिसतात.
आता या मिम्सवर चहल आणि धनश्री वर्मा यांनी त्यांचा मजेशीर व्हिडिओ अपलोड केला आहे. हा रॅप व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि त्याची सर्वत्र चर्चा झाली आहे. तो या टप्प्यावर पोहोचला आहे की निर्मात्यांनी मालिकेचा दुसरा हंगामही जाहीर केला आहे. टीझरचा व्हिडिओही समोर आला आहे.
गेल्या महिन्यातच आटोपला साखरपुडा
चहलबद्दल बोलायचं तर त्याचा मागील महिन्याच्या सुरूवातीस धनश्री वर्माशी साखरपुडा पार पडला. त्याने आपल्या साखरपूडा समारंभांचे फोटो शेअर केले होते. चहल आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाकडून खेळत आहे. या संघाची धुरा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरुवात होत असून यातील अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला
-मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार
-भारतात परतल्यानंतर सीएसकने रैनाला व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढले; आता संघात पुनरागमन…
ट्रेंडिंग लेख-
-युएईमध्ये खेळताना आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ३ दिग्गज
-वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज