Loading...

अमिताभ बच्चन यांच्या खास ट्वीटवर कोहलीने दिली ही प्रतिक्रिया…

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात केलेले ‘नोटबुक सेलिब्रेशन’ (Notebook Celebration) सध्या चर्चेत आहे.  या सामन्यात त्याने 50 चेंडूत 94 धावांची खेळी करत भारताने 6 विकेट्सने मिळवलेल्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

Loading...

त्याच्या या खेळीबद्दल आणि ‘नोटबुक सेलिब्रेशनबद्दल जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी ‘अमर अकबर ऍथनी’ या त्यांच्या जुन्या चित्रपटाचा प्रसिद्ध डॅायलागमध्ये विराटचे कौतुक केले.

अमिताभ यांनी विराट नोटबुक सेलिब्रेशन करत असतानाचे फोटो शेअर केले तसेच लिहिले की ‘यार कितनी बार बोला मई तेरे को .. की Virat को मत छेड़ , मत छेड़ , मत छेड़ … पन सुनताइच किधर है तुम … अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में !!!! देख देख .. WI का चेहरा देख ; कितना मारा उसको , कितना मारा !!” (‘यार, मी तुला किती वेळा बोललो आहे… विराटला छेडू नकोस, छेडू नकोस,… पण तु ऐकतोस कुठे… आता पावती लिहून दिली ना हातात  !!!! बघ बघ, वेस्ट इंडिजचा चेहरा बघ, किती मारला त्याला, किती मारला !!”)

Loading...

 

अमिताभ यांच्या या ट्विटनंतर विराट कोहलीनेही त्यांना प्रतिक्रिया दिली. त्याने ट्विट केले की, “हाहाहा…सर तुमचा डायलॉग आवडला. तुम्ही नेहमीच प्रेरदायी आहात.”

Loading...

या सामन्यात केसरिक विल्यम्सने (Kesrick Williams) गोलंदाजी केलेल्या 16 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराटने षटकार मारला. या षटकारानंतर विराटने त्याची बॅट पायाला टेकवून ठेवली आणि वहीत नोंद करण्यासारखी (नोटबूक सेलिब्रेशन) कृती केली. ज्याला नोटबुक सेलिब्रेशन असेही म्हटले जात आहे.

पण सामन्यानंतर त्याच्या या सेलिब्रेशनमागील कारण सांगताना विराट म्हणाला की विल्यम्सने 2017 ला जेव्हा जमैकाला झालेल्या सामन्यात त्याला 39 धावांवर बाद केले होते, तेव्हा साधारण अशाच पद्धतीचे सेलिब्रेशन विल्यम्सने केले होते. त्या सेलिब्रेशनचे हे उत्तर होते.

You might also like
Loading...