इंग्लंडचा भारत दौरा संपल्यानंतर उभय संघातील खेळाडूंना आयपीएल २०२१ चे वेध लागले आहे. भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी आपापल्या आयपीएल फ्रँचायझींकडे मोर्चा वळवला आहे. याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघनायक विराट कोहली हादेखील अपवाद नाही. तो ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी चेन्नईत पोहोचला आहे.
दुसरीकडे विराटची पत्नी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही कामावर परतली आहे. अशात चिमुकल्या लेकीचा सांभाळ कोण करत आहे? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.
जानेवारी ११, २०२१ रोजी विराट आणि अनुष्काला कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यांनी तिचे नाव वामिका असे ठेवले होते. आता हीच वामिका जवळपास २ महिन्यांची झाली आहे. त्यामुळे आई अनुष्काने पुन्हा आपल्या कामास सुरुवात केली आहे. ती मुंबई एका जाहिरातीच्या शूटींगसाठी गेली असताना आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताना कॅमेरात कैद झाली आहे. यावेळचे तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
Latest pic of @AnushkaSharma #AnushkaSharma ❤️❤️😍 pic.twitter.com/JvwxpXSZ9Z
— Anjali Sharma (@Anjali_vk_18) April 1, 2021
See Pics: @AnushkaSharma Is Now A Working Momhttps://t.co/IuZapMo1WT pic.twitter.com/E3NxIGAxri
— NDTV Movies (@moviesndtv) April 1, 2021
तर विराट इंग्लंडचा भारत दौरा संपल्यानंतर काही दिवसांसाठी घरी परतला होता. यावेळचा एक फोटो शेअर करत आपण काही दिवसांसाठी घरी असल्याची माहिती त्याने दिली होती. मात्र १ एप्रिल रोजी विराटच्या आरसीबी संघाचा सराव शिबीर सुरू होत असल्याने तो चेन्नईला रवाना झाला आहे.
Virat Kohli's latest picture, he is at Home. pic.twitter.com/JPxGJ0ovVF
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 29, 2021
If you thought we were done breaking the internet for the day, think again! 😎
Captain Virat Kohli 👑 has arrived in Chennai 🤩#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/p1BS81eChE
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 1, 2021
बाबा आणि आई दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने लेक वामिकाचा सांभाळ नैनी (लहान बाळांना सांभाळणारी स्त्री) करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नानंतर नववधूला घरी सोडून बुमराहची आयपीएल वारी, मुंबई इंडियन्सच्या गोटात दाखल; पाहा फोटो
सोन्यासारखी संधी! विराट, शिखरसह ‘हे’ खेळाडू यंदाच्या आयपीएल हंगामात करु शकतात मोठे विश्वविक्रम
केकेआरच्या ‘या’ खेळाडूला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करा; माजी विश्वविजेत्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा