चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवार(५ फेब्रुवारी) पासून सुरु झाला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात ७४ षटकांंत ६ बाद २५७ धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून रिषभ पंतने तुफानी अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
पंतने या डावात ८८ चेंडू खेळताना ९१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ षटकार व ९ चौकार मारले. पंतने मायदेशात खेळताना सलग तिसरा कसोटी सामना खेळताना ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. त्यामुळे तो विराट कोहलीनंतर असा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे, ज्याने मायदेशामध्ये कारकिर्दीतील पहिल्या तीन सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
पंतने मायदेशात यापूर्वी राजकोट आणि हैदराबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळताना अर्धशतके केली आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात तो प्रत्येकी ९२ धावांवर बाद झाला आहे.
विराटने त्याच्या कारकिर्दीतील मायदेशात पहिले तीन कसोटी सामने मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु येथे खेळले. त्यात त्याने अनुक्रमे ५२, ५८, १०३ आणि ५१ अशा धावांची खेळी केली होती.
विशेष गोष्ट अशी की हा विक्रम होत असताना पंत आणि विराटबरोबर दुसऱ्या बाजूने चेतेश्वर पुजाराच फलंदाजी करत होता.
चेतेश्वर पुजारासह ११९ धावांची भागीदारी
रिषभने चेन्नईत चालू असलेल्या कसोटी सामन्यात भारताची आवस्था ४ बाद ७३ धावा अशी असताना फलंदाजीला येत चेतेश्वर पुजारासह शतकी भागीदारी केली. त्याने आणि पुजाराने मिळून ५ व्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. पण दोघांचेही शतक हुकले. पुजारा ७३ धावांवर बाद झाला. पण त्यांच्या या भागीदारीमुळे भारताला तिसऱ्या दिवसाखेर २५० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंत चौथ्यांदा झाला नव्वदीत बाद! ‘या’ नकोशा यादीत मिळवले अव्वल स्थान
पंतची ‘ही’ चूक बघून अश्विनने लावला डोक्याला हात, व्हिडिओ होतोय व्हायरल
रिषभ पंतने ५ षटकार ठोकत एमएस धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाची केली बरोबरी