---Advertisement---

कोहली-स्मिथच्या फलंदाजीला विसाव्या वर्षाचं ग्रहण; दोघांनीही केलाय ‘हा’ नकोसा विक्रम

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 4:41 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वनडे, टी२० क्रिकेट मालिकांचा टप्पा पार पाडल्यानंतर दोन्ही संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ विकेट्सने विजय मिळवला होता. तर दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असून तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने २ धावांची आघाडी घेतली आहे. या दोन्ही कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज स्टिव्ह स्मिथ याची फलंदाजी सुमार असल्याचे दिसून आले.

नोंदवली कसोटी कारकिर्दीतील सर्वात निच्चांकी फलंदाजी सरासरी

सध्या चालू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात स्मिथ अवघ्या ८ धावांवर बाद झाला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला त्रिफळाचीत केले. तर त्यापुर्वीच्या पहिल्या डावात स्मिथ भोपळाही न फोडता मैदानाबाहेर पडला. एवढेच नव्हे तर, ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावातही त्याने प्रत्येकी १ धावा केल्या होत्या.

स्मिथच्या या अत्यंत खराब फलंदाजीमुळे त्याच्या कसोटी क्रिकेटमधील फलंदाजी सरासरीवर परिणाम झाला आहे. या ३१ वर्षीय फलंदाजाची कसोटीतील यावर्षीची फलंदाजी सरासरी फक्त १८.२५ इतकी आहे. गेल्या १० वर्षांपासून स्मिथ ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही वर्षात त्याची फलंदाजी सरासरी इतकी कमी राहिलेली नाही.

विराटचीही दयनीय अवस्था

स्मिथप्रमाणे भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीची देखील हीच परिस्थिती आहे. पालकत्त्व रजेमुळे विराट ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याचा भाग नाही. मात्र ऍडलेड कसोटी सामन्यात त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी सामन्यातील पहिल्या डावात विराटने सर्वाधिक ७४ धावांची नोंद केली होती. पण पुढील डावात तो अवघ्या ४ धावांवर बाद झाला होता.

तसेच या कसोटी मालिकेपुर्वी २०२०च्या सुरुवातीला भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यावेळीही विराटला कसोटी मालिकेत खास कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे २०२० वर्षातील त्याची कसोटी फलंदाजी सरासरी १९.३३ इतकी आहे. ही सरासरी त्याच्या आतापर्यंतच्या कोणत्याही वर्षातील निच्चांकी फलंदाजी सरासरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

व्हिडिओ: हेल्मेटमुळे वाचलं ऑस्ट्रेलियन फलंदाज डोकं; नाहीतर बुमराहच्या जोरदार चेंडूमुळे घडली असती दुर्घटना

अश्विनच्या गोलंदाजीची पुन्हा एकदा कमाल, फसवले ‘या’ स्टार ऑस्ट्रेलियन बॅट्समनला

भारतीय गोलंदाजांपुढे थंडावली स्टिव्ह स्मिथची फलंदाजी, असं आम्ही नाही ‘हा’ रेकॉर्ड सांगतोय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---