इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा प्रारंभ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने झाला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघाला २ गडी राखून पराभूत केले होते. हा मोठा सामना जिंकल्यानंतर येणाऱ्या सामन्यासाठी सराव करायचे सोडून विराट कोहली प्रायव्हेट जेटमध्ये फिरत असल्याचे फोटोज् सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असते. ती नेहमीच काही-ना-काही शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती प्रायव्हेट जेटमध्ये असल्याचे दिसून येत आहे. तिच्या हातात भरपूर स्नॅक्स आहे. या फोटोवर तिने कॅप्शन म्हणून, “ब्रेकफास्ट प्लीज” असे लिहिले आहे.
हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर जणू चर्चांना वादळ आले आहे. या फोटोमध्ये तमन्नाच्या मागे बसलेला व्यक्ती हुबेहूब विराट कोहली सारखा दिसून येत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर कमेंट्सचा पाऊस पडायला लागला. एका युजरने कमेंट करत लिहिले होते की, “विराट कोहली आयपीएल सोडून तमन्नाच्या मागे काय करत आहे.”
सर्वांनाच हा प्रश्न पडला होता की, विराट कोहली येणाऱ्या सामन्याचा सराव करायचे सोडून प्रायव्हेट जेटमध्ये काय करत आहे. परंतु जेव्हा तुम्ही हा फोटो जूम करून पाहाल; तर तुम्हाला कळेल की, तो विराट कोहली नसून तमन्ना भाटियाचा मेकअप आर्टिस्ट फ्लोरियन हुरेल आहे. या फोटोला ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
तमन्ना आपली येणारी वेब सीरिज ‘इलेवंथ ऑवर’ च्या प्रमोशनसाठी हैदराबादला जात आहे. तर विराट कोहली १४ एप्रिलला होणाऱ्या सनराइजर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यासाठी सराव करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध कृष्णाचा घातक बाऊन्सर जोराने लागला फलंदाजाच्या मानेवर अन्… बघा थरारक Video