fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

…म्हणून विराट कोहलीसाठी हे शतक महत्त्वाचे होते

पोर्ट ऑफ स्पेन। रविवारी(11 ऑगस्ट) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात डकवर्थ लूईस नियमानुसार 59 धावांनी विजय मिळवला. या विजयात विराट कोहलीने शतकी खेळी करत तर भुवनेश्वर कुमारने 4 विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला.

विराटने या सामन्यात 14 चौकार आणि 1 षटकारासह 125 चेंडूत 120 धावांची खेळी केली. विराटचे वनडेतील हे 42 वे शतक होते. तसेच मागील 11 डावांनंतर विराटने वनडेमध्ये शतक केले आहे.

त्याने या वनडे मालिकेआधी झालेल्या 2019 वनडे विश्वचषकात सलग 5 अर्धशतके करण्याचा पराक्रम केला होता. मात्र त्याला शतकी खेळी करण्यात अपयश येत होते. त्यामुळे त्याच्यासाठी हे शतक महत्त्वाचे असल्याचे भुवनेश्वरने सामना संपल्यानंतर सांगितले आहे.

भुवनेश्वर कुमार म्हणाला,  ‘विराटच्या भावनापाहुन तुम्हाला समजू शकते की विराटसाठी हे शतक किती महत्त्वाचे होते. असे नव्हते की तो लयीत नव्हता, उलट तो 70 किंवा 80 धावा करुन विश्वचषकात बाद होत होता आणि तो नेहमीच मोठी खेळी करण्यासाठी ओळखला जातो.’

‘खेळपट्टी फलंदाजीसाठी कठिण होती. जेव्हा विराट बाद होऊन ड्रेसिंग रुममध्ये आला तेव्हा त्याने सांगितले की चेंडू जूना झाल्यानंतर धावा करणे सोपे नाही.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

जेव्हा फलंदाज विराट कर्णधार विराटचे नाव इतिहासात लिहीतो

११ धावांवर बाद झाला ख्रिस गेल पण केला हा मोठा विश्वविक्रम

विराट कोहली हा मोठा पराक्रम करत रोहित शर्माला ठरला सरस!

You might also like