आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ भारतीय संघासाठी दुर्देवी ठरताना दिसतो आहे. सुरुवातीला पाकिस्तान संघाने पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला १० विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर आता रविवार रोजी (३१ ऑक्टोबर) पुन्हा एकदा भारतीय संघाच्या हाती निराशा आली आहे. न्यूझीलंड संघाने भारताला ८ विकेट्स राखून मात दिली आहे. यासह त्यांचा टी२० विश्वचषकातील पुढील प्रवास खडतर बनला आहे. या दोन्हीही सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली खराब रणनिती आणि फलंदाजी फळीबाबत गोंधळलेला दिसला आहे.
त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी क्रमाबाबत घेतलेले काही निर्णय भारतीय संघाच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसते.
अनुभवहीन इशान किशनकडून सलामी
टी२० विश्वचषकापूर्वी झालेल्या आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्यात इशान किशन खराब फॉर्ममध्ये होता. यानंतरही टी२० विश्वचषकासारख्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांसारख्या अनुभवी सलामी जोडीच्या उपस्थितीतही इशानसारख्या अननुभवी फलंदाजाला सलामीला पाठवण्याचा निर्णय न पटण्याजोगा आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराटने हीच चूक केली. सलामीला फलंदाजीसाठी आलेला इशान ८ चेंडूंमध्ये फक्त ४ धावांवर झेलबाद झाला.
रोहित शर्माच्या सलामीवीराच्या रुपातील आकडेवारींवर दुर्लक्ष
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा फ्लॉप ठरला होता. तरीही रोहितसारख्या अनुभवी सलामीवीरावर कर्णधार विराट कोहलीने विश्वास दाखवायला पाहिजे होता. मात्र विराटने असे केले नाही. त्याने रोहितला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आणि तो १४ धावांवर बाद झाला.
रोहितने त्याच्या कारकिर्दीत ७९ टी२० सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने २४०४ धावा केल्या आहेत.
मधल्या फळीत केएल राहुलच्या अनुभवाचा वापर न करणे
कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात वरच्या फळीत बदल करायचेच होते. तर त्याने केएल राहुलबाबत हा बदल करणे योग्य ठरले असते. इशान किशनसोबत केएल राहुलला सलामीला पाठवण्यासाठी इशान आणि रोहित शर्माची जोडी सलामीसाठी निवडायला पाहिजे होती. तर राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायला हवे होते. यामुळे विराटच्या त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकला असता. अशाप्रकारे भारतीय संघाची फलंदाजी फळी अजून मजबूत बनली असती.
कारण राहुलचे टी२० क्रिकेटमधील चौथ्या क्रमांकावरील फलंदाजी प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. त्याने या क्रमांकावर कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ८७ च्या सरासरीने १७४ धावा केल्या आहेत. याच क्रमांकावर टी२० क्रिकेटमध्ये शतकही ठोकले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मागील २०१९ विश्वचषकातही विराट अशाच काहीशा दुविधेत अडकल्याचे दिसले होते. परिणामी भारतीय संघाला उपांत्य फेरी सामन्यापर्यंत पोहोचूनही निराशेसह परतावे लागले होते. न्यूझीलंड संघानेच या सामन्यात भारताला पराभूत करत त्यांचा विश्वचषकातील प्रवास संपवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
जखमेवर मीठ! मोठ्या फटक्याच्या नादात कोहली झेलबाद, कॅच टिपल्यानंतर बोल्टने ‘अशी’ उडवली खिल्ली
दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर! असगर अफगाणला मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ