Loading...

‘द्विशतकवीर’ विराट कोहलीचा हा कारनामा दुर्लक्षित करुन चालणार नाही!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारताने आपला पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषीत केला.

या डावात दुसऱ्या दिवसाची काही षटके बाकी असताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने दुहेरी शतक करत एक नवा विक्रम केला. विराटने 295 व्या चेंडूवर 28 चौकारांच्या मदतीने दुहेरी शतक पूर्ण केले.

त्याने या डावात 336 चेंडूत 33 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 254 धावा केल्या. विराटचे हे कसोटी कारकिर्दीतील 7 वे द्विशतक आहे.

त्याच्या या द्विशतकी खेळीमुळे विराट भारताकडून कसोटीत सर्वाधिक द्विशतके करणारा फलंदाज बनला आहे. याआधी कसोटीत भारताकडून सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रम विराट, सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्या नावावर संयुक्तरित्या होता.

पण विराटने आता सचिन आणि सेहवागला मागे टाकले आहे. सचिन आणि सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 6 द्विशतके केली आहेत.

Loading...

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणारे खेळाडू –

डोनाल्ड ब्रॅडमॅन – 12

कुमार संगाकारा – 11

ब्रायन लारा – 9

Loading...

विराट कोहली – 7

वॅली हेमंड – 7

माहेला जयवर्धने – 7

विरेंद्र सेहवाग – 6

Loading...

मार्वन अट्टापट्टू – 6

जावेद मियाँदाद – 6

युनुस खान – 6

रिकी पाँटींग – 6

सचिन तेंडूलकर – 6

Loading...
You might also like
Loading...