विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे भारताने पहिल्या तीन विकेट्स डकवर गमावल्या. रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर हे तिघेही शुन्यावर बाद झाले. पण त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यातील मोठी भागीदारी पाहायला मिळाली. विराट कोहलीने यादरम्यान, सचिन तेंडुलकर याचा मोठा विक्रम देखील मोडीत काढला.
आयसीसी स्पर्धा म्हणजेच वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आता सर्वाधिक धावा करणारा भारतीय बनला आहे. याआधी हा विक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulak) याच्या नावावर होता. सचिनने आपल्या कारकिर्दीत वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन महत्वाच्या स्पर्धांमध्ये एकूण 2713 धावा केल्या होत्या. विराटने मात्र रविवारी (8 ऑक्टोबर) हा विक्रम मोडला. (Virat Kohli become Most run scorer for Indian in WC + CT + T20WC)
आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू (वनडे विश्वचषक+टी-20 विश्वचषक+चॅम्पियन्स ट्रॉफी)
2720* – विराट कोहली
2719 – सचिन तेंडुलकर
2422 – रोहित शर्मा
1707 – युवराज सिंग
1671 – सौरव गांगुली
1492 – एमएस धोनी
आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट चौथ्या क्रमांकावर
एकंदरीत विचार केला, तर या तीन आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा ख्रिस गेल (2942) याच्या नावावार आहे. यादीत दुसरा क्रमांकाल कुमार संगकारा (2876) याचा आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर माहेला जयवर्धने (2858) याचा आहे. विराट आता या यादीत चौथ्या, तर सचिन पाचव्या क्रमांकावर आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याविषयी
उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 199 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात संघाची धावसंख्या 2 असताना भारताने तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या. पण विराट आणि केएल राहुलच्या जोडीने संघाला सुस्थितीत पोहोचवले. 75 चेंडूत विरानटे अर्धशतक केले.
विश्वचषकातील पाचव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड
महत्वाच्या बातम्या –
भारताची जर्सी घालून मैदानात घुसणे जार्वोला पडलं महागात! विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीची मोठी कारवाई
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेच्या वाट्याला अजून एक दुःख, आयसीसीच्या कावाईचा करावा लागणार सामना