वनडे विश्वचषक 2023 मध्ये विराट कोहली याने अनेक नवीन विक्रम नावावर केले. पण बुधवारी (15 नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यात एक महाविक्रम विराटच्या हातून मोडीत निघाला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला वनडे शतकांच्या बाबतीत विराटने मागे टाकले. या कामगिरीनंतर विराटच्या मनातील सचिनविषयी असणारा आदर लाईव्ह सामन्यात सर्वांना पाहायला मिळाला.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील या सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला गेला. विराट कोहली याने 113 चेंडूत 117 धावांची महत्वपूर्ण खेळी या सामन्यात साकारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय विराटने योग्य सिद्ध केला. वनडे क्रिकेटमधील हे त्याचे 50वे शतक होते. माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याला वनडे शतकांच्या बाबतीत त्याने मागे टाकले. विशेष म्हणजे सचिन स्वतः सामना पाहण्यासाठी वानखेडेच्या स्टॅन्डमध्ये उपस्थित असताना विराटने त्याचा हा विक्रम मोडीत काढला आणि वनडे क्रिकेमटध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला.
सचिनच्या वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढल्यानंतर विराट सचिनकडे पाहून नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच सचिन देखील स्टॅन्डमधून त्याला प्रोत्साहन देताना दिसला. दोघांमधील हे क्षण कॅमेरॉत कैद झाले असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Virat Kohli bowing down to Sachin Tendulkar after reaching his 50th century.
Moment of the day! pic.twitter.com/RH8QXtLwmt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
भारताने या सामन्यात 50 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 397 धावा साकारल्या. यात सलामीवीर रोहित शर्मा याच्या 47 धावांचे योगदान होते. शुबमन गिल याने 80 धावा केल्यानंतर त्याच्या पायाच्या नसा तानल्या गेल्या आणि त्याला मैदान सोडावे लागले. विराटच्या 117 धावा, तर श्रेयस अय्यर याच्या 105 धावा संघासाठी महत्वाच्या ठरल्या, केएल राहुल यानेही 39* धावांचे योगदान दिले. (Virat Kohli bowing down to Sachin Tendulkar after reaching his 50th ODI century. )
विश्वचषक 2023 उपांत्य सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
महत्वाच्या बातम्या –
CWC 23 : 48 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात न बनलेला विक्रम, 2023मध्ये बनला; पहिल्यांदाच…
विराटने 20 वर्षानंतर बदलला इतिहास! मिळवला World Cup मधील सर्वात यशस्वी फलंदाजाचा बहुमान