---Advertisement---

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानविरुद्ध विराटसाठी चालून आली मोठी संधी, लगेच वाचा

Sachin Tendulkar Virat kohli
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबरला आमने-सामने असतील. अशातच भारतीय संघाचा महान फंलदाज विराट कोहलीकडे एक विक्रम करण्याची संधी चालून आली आहे. विराट क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाचा महान फंलदाज सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला विक्रम मोडू शकतो.

विराट कोहली (Virat Kohli) याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 275 सामने खेळले आहेत. त्याने 265 डावांमध्ये 40 वेळा नाबाद राहता असताना एकूण 12898 धावा केल्या आहेत. या प्रकारामध्ये आतापर्यंत 46 शतके झळकावणारा विराट 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषक 2023 सामन्यात 102 धावा करू शकतो. जर त्याने हा कारणामा केला, तर तो भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला मागे टाकून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13000 धावा करणारा फलंदाज ठरेल.

विकराटकडे सचिनला या विक्रमात मागे टाकण्यासाठी एक दोन नव्हे तर 55 संध्या आहेत. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम मोडताना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. क्रिकेटचा देव सचिनने 321 वनडे सामन्यात हा कारणामा केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पॉंन्टिंग याने 341 सामन्यात 13000 वनडे धावा केल्या आहे. सोबच श्रीलंकेचा महान फलंदाजल कुमार संगकाराने 13000 धावा करण्यासाठी 336 सामन्यांचा वेळ घेतला आहे.

विश्वचषकात भारत अणि पाकिस्तन यादिवशी येणार आमने-सामने
आशिया चषक 2023 समाप्त झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघासोबत 3 सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. यामुळे भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. विश्वचषक 2023 ची सुरवात 5 ऑक्टोंबर पासून होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना 8 ऑक्टोंबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारत कट्टर प्रतीस्पर्धी पाकिस्तान संघासोबत 14 ऑक्टोंबर नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणार आहे. (virat kohli break the record of sachin tendulkar most fastest odi 13000 runs )

महत्वाच्या बातम्या-  
हुबळी टायगर्स महाराजा टी20 चॅम्पियन! कॅप्टन मनीष पांडेच्या क्षेत्ररक्षणाने पलटली बाजी 
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किड्स गटात फिंच संघाला विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---