---Advertisement---

बांगलादेशच्या गोलंदाजांची आता खैर नाही! कडक सिक्स मारत विराटने सराव सत्रादरम्यान तोडली भिंत

virat kohli broke wall
---Advertisement---

बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. भारतीय संघाला या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळायचा आहे. भारतीय फलंदाज विराट कोहली या मालिकेत आपल्या बॅटची ताकद दाखवण्यासाठी नेट्समध्ये भरपूर मेहनत घेत आहे. अशातच विराटने सरावादरम्यान एका शॉटने शो चोरला, जिथे त्याने जोरदार षटकार मारत चक्क भिंत तोडली आहे. विराटने भिंत तोडल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने भिंत तोडली
सोशल मीडियावर सराव सत्रातील विराटचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत विराटने चेन्नईमध्ये फलंदाजीच्या सरावात एवढा दमदार षटकार मारला की, चेंडू थेट स्टेडियमच्या भिंतीला भेदून गेला. विराटचा हा फटका इतका ताकदवान होता की, भिंतही त्याचा फटका सहन करू शकली नाही आणि तुटली. विराटच्या शॉटने भिंत तुटल्याचा फोटो पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत

या व्हायरल फोटोनंतर, बांगलादेशविरुद्ध विराट कोहली गोलंदाजांना भिंतीप्रमाणे एवढा मारेल की त्यांचे मनोधैर्य खचून जाईल, असे चाहते म्हणत आहेत.

कोहली दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतत आहे. विराट अखेरचा जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. आता बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी विराट कोहली चांगलाच चर्चेत दिसत आहे. विराट कोहली बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावेल अशी चाहत्यांना आशा आहे. विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक 2017 मध्ये झळकावले होते. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोहलीने 204 धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत एकही षटकार नव्हता, पण त्याने 24 चौकार मारले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘हे’ क्रिकेटपटू आहेत दारुचे शौकीन; एकाने तर दारूच्या नशेत शतकही ठोकलंय!
वनडे मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार बटलर बाहेर; केवळ 15 सामने खेळलेल्या खेळाडूकडे नेतृत्व
एकाच कुटुंबातील मुले वेगवेगळ्या देशांसाठी खेळणार, सॅम-टॉम करनचा तिसरा भाऊ ‘या’ देशाकडून खेळणार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---