दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (IND vs SA) यांच्यात केपटाऊन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकलेला हा भारतीय कर्णधार अखेरच्या सामन्यात चांगल्याच लयीत असल्याचे दिसते आहे. त्याने प्रथम फलंदाजी करताना भारताकडून पहिल्या डावात शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे अप्रतिम झेल टिपत संघाला मोठ्या विकेट्सही मिळवून दिल्या आहेत. या झेलांसह त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा जोडला गेला (Virat Kohli’s Catch Record) आहे.
फलंदाजी करताना ७९ धावांची शानदार खेळी करणाऱ्या विराटने क्षेत्ररक्षणातही चपळता दाखवली आहे. भारताच्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उमेश यादव डावातील ४० व्या षटकात गोलंदाजी करण्यास आला होता. त्याच्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी वॅन डर डूसेनने सेकंड स्लिपमध्ये शॉट खेळला. यावर सेकंड स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या कोहलीने अचूक झेल टिपला आणि डूसेनला २१ धावांवर तंबूत धाडण्यात योगदान दिले.
व्हिडिओ पाहा-
त्यानंतर मोहम्मद शमी यालाही सामन्यातील पहिली विकेट मिळवून देण्यात कोहलीचे सहकार्य केले. डावातील ५६ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या शमीच्या दुसऱ्या चेंडूवर टेम्बा बावुमाने सेकंड स्लिपमध्ये खराब शॉट खेळला. यावर कोहलीने डाव्या अंगाला डाईव्ह मारत चेंडू मैदानावर पडण्यापूर्वी अलगद झेल घेतला आणि बावुमाला २८ धावांवर झेलबाद केले.
हे २ झेल घेत कोहलीने क्षेत्ररक्षकाच्या रूपात कसोटीतील आपले १०० झेल पूर्ण केले (Virat Kohli Completed 100 Test Catches) आहेत. केवळ ९९ कसोटी सामन्यांमध्ये त्याने हा पराक्रम केला आहे. यासह कोहली कसोटीत १०० झेल टिपणारा सहावा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे.
Virat Kohli completes 1️⃣0️⃣0️⃣ catches in Test cricket ????
He is the sixth Indian fielder, who isn't a wicket-keeper, to get to the milestone in Tests.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE1P6t pic.twitter.com/g7eoPK0wnB
— ICC (@ICC) January 12, 2022
भारताकडून कसोटीत सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक (Most Test Catches By Indian Cricketers)
राहुल द्रविड- २१० झेल (१६४ सामने)
व्हीव्हीएस लक्ष्मण- १३५ झेल (१३४ सामने)
सचिन तेंडूलकर- ११५ झेल (२०० सामने)
सुनिल गावसकर- १०८ झेल (१२५ सामने)
मोहम्मद अझरुद्दीन- १०५ झेल (९९ सामने)
विराट कोहली- १०० झेल (९९ सामने)*
अशाप्रकारे गेल्या २ वर्षांपासून कोहलीच्या बॅटमधून शतक निघण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या विराटप्रेमींना त्याचे झेलचे हे शतक पाहण्याचे सौभाग्य लाभले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथचा ‘कार’तोड षटकार एकदा पाहाच, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ऍव्हेंजर्सचा संघर्षपूर्ण विजय
हेही पाहा-