आयपीएल २०२० चा ३१ वा सामना गुरुवारी (१५ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना पंजाब संघाने ८ विकेट्सने जिंकला. असे असले तरी बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात इतिहास रचला आहे.
खरं तर विराट कोहलीने आयपीएल इतिहासात बेंगलोर संघासाठी पंजाबविरुद्ध आपला २०० वा सामना खेळला. त्याने आयपीएलमध्ये बेंगलोरसाठी १८५ सामने खेळले आहेत, तर उर्वरित १५ सामने त्याने बेंगलोरसाठी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळले होते. अशाप्रकारे तो बेंगलोर संघासाठी २०० सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
नाणेफेकीदरम्यान त्याला विचारण्यात आले होते की, तुला ही कामगिरी केल्यानंतर कसे वाटत आहे? यावर त्याने म्हटले होते की, हे माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
तो म्हणाला, “माझ्यासाठी बेंगलोर संघ खूप महत्त्वपूर्ण आहे. माझी ही भावना अनेक लोक समजू शकणार नाहीत. संघासाठी २०० सामने खेळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. २००८ मध्ये मी कधीच विचार केला नव्हता की, असे होईल. हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. त्यांनी मला संघासोबत ठेवले आणि मी संघाचा भाग बनून राहिलो.”
यापूर्वी त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १९७ वा सामना खेळताना जेम्स हिलड्रेथचा विक्रम मोडला होता. हिलड्रेथने समरसेट संघासाठी १९६ टी२० सामने खेळले होते.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात बेंगलोर संघ चांगली कामगिरी करत आहे. मागील २ सामन्यांमध्ये संघाने शानदार विजय मिळवला आहे. आतापर्यंत बेंगलोरने ८ सामने खेळले असून त्यात त्यांनी ५ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पॉईंट्स टेबलबद्दल बोलायचं झालं तर बेंगलोर संघ १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘त्या’ खेळाडूला दिलेल्या जीवदानामुळेच आम्ही सामना गमावला – विराट कोहली
-काय सांगता! आजपर्यंत आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘हा’ गोलंदाज एकदाही करु शकला नाही बाद
-एकच नंबर! पृथ्वी शाॅने मारलेला खणखणीत षटकार पाहून विराट कोहली अचंबित, पाहा व्हिडिओ
-विराट-डिविलियर्सच्या जोडीला तोडंच नाही, ‘या’ जोड्यांना मागे टाकत रचलाय खास विक्रम
ट्रेंडिंग लेख-
-नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही
-IPL- दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये इशांत शर्माची जागा घेण्यास ३ खेळाडू तयार
-गौतम गंभीर का ठरला टीम इंडियासाठी संकटमोचक, हे दाखवून देणाऱ्या ३ खेळी