डिसेंबर महिन्याच्या अंती भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) गेला होता. या मालिकेच्या सुरुवातीला उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका (3 Matches Test Series) झाली असून भारताने १-२ च्या फरकाने ही मालिका गमावली आहे. या मालिका पराभवासह भारताने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत धूळ चारण्याची संधी पुन्हा एकदा गमावली आहे. या मालिका पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने एका लाजिरवाण्या विक्रमात माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याची बरोबरी केली आहे.
केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना पार पडला. या सामन्यातून दुखापतग्रस्त विराट कोहली याने संघात पुनरागमन केले होते. त्याच्या नेतृत्त्वाखाली हा सामना जिंकत १-१ ने बरोबरीत असलेली कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे होती. परंतु सामन्याअंती फलंदाजीतील खराब प्रदर्शनानंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही भारतीय खेळाडूंना विशेष प्रदर्शन करता आले नाही. परिणामी त्यांना ७ विकेट्स राखून हा सामना गमवावा लागला आहे.
व्हिडिओ पाहा-
विराटने केली धोनीची बरोबरी
केपटाऊन कसोटीतील पराभवानंतर विराटने कर्णधाराच्या रूपात सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांविरुद्ध १४ वा कसोटी सामना (Most Test Matches Defeat Against SENA)गमावला आहे. यापूर्वी सेना देशांविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामन्यात पराभूत होण्याचा नकोसा विक्रम धोनीच्या नावे होता. त्यानेही सेना देशांविरुद्ध १४ कसोटी सामने गमावले होते. परंतु आता विराटने या लाजिरवाण्या विक्रमात धोनीची बरोबरी (Kohli Equals Dhoni) केली आहे.
भारताचे लक्ष्य आता वनडे मालिका जिंकण्यावर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर आता उभय संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. १९ जानेवारी, २१ जानेवारी आणि २३ जानेवारी हे वनडे सामने होणार आहे. पर्ल आणि केपटाऊनच्या मैदानांवर होणारी ही वनडे मालिका जिंकत कसोटी मालिका पराभवाचा वचपा काढण्यावर भारतीय संघाची नजर असेल. वनडे मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची कमान केएल राहुल याच्या हाती असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आमने-सामने आले जाफर आणि वॉन, पेटले ट्वीटरवॉर
केपटाऊन कसोटीतील डीआरएसच्या वादानंतर भारतीय खेळाडूंवर होणार कारवाई? वाचा सविस्तर
हेही पाहा-