भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं आपल्या खेळाच्या जोरावर स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तो जिथेही गेला, तेथे त्यानं आपल्या बॅटची जादू दाखवली. कोहलीचे जगभरात करोडो चाहते आहेत. शेजारी देश पाकिस्तानमध्येही विराटला खूप पसंत केलं जातं. अनेकवेळा चाहत्यांनी त्याच्याबद्दलची आपुलकी जाहीरपणे व्यक्त केली आहे. आता पुन्हा एकदा असंच काहीसं पाहायला मिळालं.
सध्या पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स कप खेळला जात आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानपासून ते शाहीन आफ्रिदीपर्यंत सर्वच आघाडीचे पाकिस्तानी खेळाडू या देशांतर्गत स्पर्धेत खेळतायेत. काही आघाडीच्या खेळाडूंना संघाचं कर्णधारपदही मिळालं. मात्र बाबरची निवड केवळ खेळाडू म्हणून झाली आहे.
आता या स्पर्धेच्या एका सामन्यादरम्यान घेतलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोमध्ये स्टेडियममधील एका चाहत्याच्या हातात विराट कोहलीची 18 क्रमांकाची जर्सी दिसत होती. आपण कॅमेऱ्यात कैद होत असल्याचं चाहत्याच्या लक्षात येताच त्यानं दोन्ही हातांनी जर्सी वर करून दाखवली.
Virat Kohli’s number 18 Jersey during the Champions Cup tournament in Pakistan.
– The Face of cricket, Kohli 🐐 pic.twitter.com/h0zViFTUJx
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2024
पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहलीबद्दल आपलं प्रेम दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशा काही घटना घडल्या आहेत. यावरून दिसून येतं की, विराट कोहलीनं सर्व भौगोलिक सीमा ओलांडून आपल्या खेळानं सर्वांची मनं जिंकली आहेत.
विराट कोहली शेवटचा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. यानंतर तो जवळपास एक महिन्याचा ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासह लंडनला गेला. आता तो चेन्नईतील टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतला असून, तेथे तो बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी सराव करतोय.
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यामध्ये कोहलीची भूमिका महत्त्वाची असेल.
हेही वाचा –
इशान किशनचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, शतक ठोकल्यानंतर शेअर केली दोन शब्दांची सूचक पोस्ट
देशांतर्गत क्रिकेटमध्ये 19 शतकं, मात्र अजूनही टीम इंडियात स्थान नाही; या फलंदाजानं मधल्या फळीसाठी ठोकला दावा
मोहम्मद शमीचा टीम इंडियात कमबॅक कधी? स्वत: दिलं मोठं अपडेट