ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश (INDvBAN) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. संथ सुरुवातीनंतर भारतीय संघाने विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्या शानदार खेळाच्या जोरावर बांगलादेश समोर विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य ठेवले.
उपांत्य दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला अपयश आले. तो सुरुवातीपासूनच चाचपडत खेळत असलेला दिसला. बाद होण्यापूर्वी त्याने 8 चेंडूवर 2 धावा केल्या. या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत 32 चेंडूवर 50 धावा केल्या.
राहुल बाद झाल्यानंतर या स्पर्धेत भारताचे सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. सूर्यकुमारने केवळ 16 चेंडूंवर 30 धावांचा तडाखा दिला. अष्टपैलू हार्दिक पंड्या (5) व दिनेश कार्तिक (7) हे पुन्हा एकदा अपयशी ठरले. मात्र, विराटने कोणताही दबाव न घेता आपली शानदार फलंदाजी सुरू ठेवली. त्याने 37 चेंडूत स्पर्धेतील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले.
अखेरच्या तीन षटकात बांगलादेशने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना केवळ अक्षर पटेलला बाद करण्यात यश आले. विराटने 19 व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर दहा धावा वसूल केल्या. रविचंद्रन अश्विननेही अखेरच्या षटकात एक चौकार व एक षटकार लगावला. भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 184 धावा केल्या. विराटने नाबाद 64 धावांची खेळी केली. बांगलादेशसाठी हसन मेहमूदने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका चेंडूने बनवले व्हिलन एकाने हिरो! जीवदान मिळाल्यावर दोन चेंडूच टिकू शकला रोहित
बांगलादेश बनला टॉसचा बॉस! टीम इंडियाला फलंदाजीचे आमंत्रण; संघात महत्त्वपूर्ण बदल