भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवार रोजी (१५ जानेवारी) अचानक कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का (Virat Kohli Step Down As Test Captain) दिला आहे. स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर त्याच्याकडून वनडे संघाची कमानही काढून घेण्यात आली होती. त्यानंतर नुकतीच भारतीय संघाने विराटच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ ने गमावली आणि त्यानंतर त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली.
यानंतर आता विराटने आपल्या या निर्णयाबद्दल सर्वप्रथम कोणाला माहिती दिली होती?, त्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा झाला आहे. तसेच त्याने आपल्या या निर्णयासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेत बीसीसीआय (BCCI)ला कधी कळवले, हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid)यांच्याशी विराटने सर्वप्रथम कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडण्याविषयी चर्चा केली होती. शुक्रवारी रात्री विराटने त्यांना यांसदर्भात कळवले होते. त्यानंतर त्याने बीसीसीआयचे सचिन जय शहा यांना आपण कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्वरित शहांनी त्याचा राजीनामा मंजूरही केला असल्याचे समजत आहे.
व्हिडिओ पाहा-
विराटने कसोटी कर्णधारपद सोडताना काय म्हटले?
विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्याबद्दल भावनिक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘संघाला योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी गेली ७ वर्षे कठोर परिश्रम, चिकाटीने प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले आणि यात कसलीही कसर सोडलेली नाही. पण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची माझी वेळ आली आहे.’
‘या प्रवासादरम्यान अनेक चढ-उतार आले, पण प्रयत्नांचा किंवा विश्वासाचा अभाव कधीच नव्हता. मी जे काही काम करतो त्यासाठी १२० टक्के समर्पण देण्यावर मी विश्वास ठेवतो आणि जर मी ते करू शकत नसेल, तर मला माहित आहे की, असं करणे योग्य नाही. माझ्या मनात गोष्टी पूर्ण स्पष्ट असतात आणि मी कधीही संघाबरोबर अप्रामाणिक वागू शकत नाही.’
पुढे विराटने म्हटले आहे की, ‘मला बीसीसीआयचे आभार मानायचे आहेत की, दिर्घकाळासाठी त्यांनी मला राष्ट्रीय संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सर्व संघसहकाऱ्यांचे आभार, ज्यांनी मी संघासाठी बाळगलेल्या ध्येयासाठी योगदान दिले आणि ज्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही. तुम्ही सर्वांनी हा प्रवास अविस्मरणीय आणि सुंदर केला.’
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
याबरोबरच भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असलेल्या विराटने पुढे लिहिले आहे की, ‘रवी भाई (रवी शास्त्री) आणि सपोर्ट स्टाफ यांचेही आभार, ते कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने प्रगती करणाऱ्या या गाडीचे इंजिन होते. तुम्ही सर्वांनी ध्येय प्रत्यक्षात गाठण्यासाठी सर्वात मोठा वाटा उचलला.’
विराटने एमएस धोनीहीचे आभार मानले. त्याने म्हटले की, ‘शेवटी, विशेष आभार एमएस धोनीचे, ज्याने माझ्यावर कर्णधारपदासाठी आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेणारी सक्षम व्यक्ती म्हणून माझ्यावर विश्वास टाकला.”
महत्त्वाच्या बातम्या-
कोणाच्या डोक्यावर सजणार कसोटी संघाच्या नेतृत्वाचा काटेरी मुकुट? रोहित, राहुल की अन्य कोण?
हेही पाहा-