रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सोमवारी (२ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पराभूत होऊनही बेंगलोर संघ आयपीएल २०२०च्या प्लेऑफमध्ये एन्ट्री करणारा तिसरा संघ ठरला आहे. त्यांनी नेट रनरेटच्या आधारे कोलकाता नाईट रायडर्स संघाला मागे टाकत अशी कमाल केली. आता बेंगलोर संघाला प्लेऑफचे सामने खेळायचे आहेत. परंतु यापूर्वीच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉने विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील बेंगलोर संघाला या शर्यतीतून बाहेर केले आहे.
तो म्हणाला, विराटच्या संघात पुढील तीन सामने जिंकून आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरण्याची ताकद नाही. बेंगलोर संघाने आतापर्यंत आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. त्यामुळे ते यावेळी आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. आयपीएलच्या १३ व्या हंगामात बेंगलोरने पहिल्या हाफमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच त्यांना टॉप-४ संघांमध्ये स्थान मिळवण्यात यश आले.
बेंगलोरमध्ये जिंकण्याची क्षमता नाही- मायकल वॉ
बेंगलोरच्या विजयाबाबत बोलताना वॉ पुढे म्हणाला, “बेंगलोर संघ यावर्षी जिंकू शकतो का? परंतु मी सुरुवातीपासूनच म्हणत आहे, मला नाही वाटत की त्यांच्यात यावर्षी जिंकण्याची क्षमता आहे.”
“सन २०२० या वर्षात काहीही होऊ शकते. जग पल्टी होऊ शकते. कोणालाच माहिती नाही की काय होणार आहे. विराट कोहली डाव्या हाताने फलंदाजी करत सामना जिंकू शकतो. परंतु हा मोठा क्रम आहे,” असेही वॉ म्हणाला.
वॉला वाटते की, बेंगलोर संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता आहे. जे संघाला सलग ३ सामन्यातील दबाबातही चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देतील.
बेंगलोर संघाने या हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये ७ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ७ सामन्यांमध्ये पराभव स्विकारला आहे.
परंतु विराट आता वॉचे वक्तव्य खोटे ठरवत पहिल्या वहिल्या विजेतेपदावर आपल्या संघाचं नाव कोरतो का, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-“पराभूत होऊनही क्वालिफाय होणाऱ्याला RCB म्हणतात “, प्ले ऑफमध्ये स्थान मिळवल्यानंतर मीम्स व्हायरल
-आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘हा’ युवा गोलंदाज कायमच नडतो, सर्वाधिक वेळा केलंय बाद
-कमाल लाजवाब राहूल! आयपीएलमध्ये अनोखी कामगिरी करत विराट कोहलीच्या विक्रमाची केली बरोबरी
ट्रेंडिंग लेख-
-IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?