---Advertisement---

दशकानंतर आता शतकावरही राज्य! डेली टेलिग्राफच्या ‘या’ यादीत कोहली दुसर्‍या क्रमांकावर

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 3:51 PM
---Advertisement---

नुकेतच ऑस्ट्रेलियाच्या डेली टेलिग्राफने २१व्या शतकातील ५० महान खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत भारताचा नियमित कर्णधार आणि अव्वल फलंदाज विराट कोहलीने दुसरे स्थान पटकाविले आहे. २००८ साली भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या कोहलीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर हे स्थान मिळविले आहे.

आत्तापर्यंत भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळतांना विराटने तब्बल २२ हजाराहून अधिक धावा काढल्या आहेत. तसेच ७० शतकेही ठोकले आहेत. विशेष म्हणजे तिन्ही प्रकारांत त्याची सरासरी ५०हून अधिक आहे. कोहलीच्या या अविश्वसनीय आकडेवारीमुळेच अनेक दिग्गजांना मागे टाकत त्याने या यादीत दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली आहे.

डेली टेलिग्राफने जाहीर केलेल्या या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने अव्वल स्थान मिळविले आहे. गिलख्रिस्ट क्रिकेटमधील सार्वकालीन महान यष्टीरक्षकांमधील एक मानला जातो. डाव्या हाताने स्फोटक फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूची दहशत जगातील अनेक गोलंदाजांना होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग असून चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आहे. पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन असून सहाव्या क्रमांकावर विद्यमान ऑस्ट्रेलियन संघाचा प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथ विराजमान आहे.

दरम्यान भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तेथे चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही भारताने दमदार पुनरागमन करत विजय मिळविला. त्यामुळे १-१ अशी बरोबरीत असलेली मालिका रंगतदार अवस्थेत उभी ठाकली आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात होईल.

महत्वाच्या बातम्या:

“भारताला ब्रिस्बेनला जायचं नाही कारण ऑस्ट्रेलिया तिथे नेहमीच जिंकतो”, ऑसी क्रिकेटरचे खळबळजनक वक्तव्य

विलियम्सनचा शतकी तडाखा! स्टिफन फ्लेमिंगच्या ‘या’ विक्रमालाही दिला धक्का

केन विलियम्सनचा पुन्हा शतकी धमाका! ‘हा’ विक्रम करत विराटलाही टाकलंय मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---