Virat Kohli Record IND vs SA: केपटाऊन मध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभूत केले. भारतीय गोलंदाजांसोबतच फलंदाजांची भूमिका महत्तवाची राहिली. विराट कोहली याने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात 46, तर दुसऱ्या डावात 12 धावांची खेळी केली. या सामन्यात त्याला एकही अर्धशतक करता आले नाही, पण माजी कर्णधाराच्या नावावर एक ‘विराट’ विक्रम नोंदवला गेला.
विराट कोहली (Virat Kohli) हा टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज असून त्याने अनेकदा संघासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली आहे. कोहली भारताबाहेर कसोटी सामना खेळताना सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय ठरला आहे. आत्तापर्यंत भारताकडून खेळताना एक खेळाडू म्हणून त्याने 15 कसोटी सामने जिंकले आहे. या बाबतीत त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे सोडले आहे. विराटच्या बरोबरीने अजिंक्य रहाणे हादेखील पहिल्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा आणि ईशांत शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांनी भारताबाहेर 14-14 कसोटी सामने जिंकले आहे.
भारताचे माजी खेळाडू वीवीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनाही विराटने मागे टाकले आहे. लक्ष्मण आणि द्रविड विदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी भारताबाहेर प्रत्येकी 13-13 विजय मिळवले आहेत. तसेच भारताचा वेगवान गोेलंदाज जसप्रीत बुमराह या 11 सामन्यात विजयी मिळवला आहे.
IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियनमध्ये सुरू झाला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेने एक डाव 32 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेवर मात केली. केपटाऊनमधील विजयामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही कसोटी मालिका 1-1 अशा बरोबरीत सोडवता आली. दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला. (Virat Kohli has become the Indian player who has won the most Test matches outside India)
महत्वाच्या बातम्या –
‘डोकं लावत आहात…’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितचं मजेशीर उत्तर, पुन्हा लुटली मैफील
परदेशात कसोटी जिंकून देण्यात ‘या’ सहा खेळाडूंचा नादच खुळा, सचिन आसपासही नाही