भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर असताना नेहमीच मस्ती करताना दिसतो. तो एक मजेदार क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होतात. पण कोहलीसोबत एकदा असा प्रँक झाला, जो तो आयुष्यभर विसरू शकणार नाही, असे म्हटले तर तुमचा विश्वास बसेल का? खरे तर ही घटना 2008 साली घडली होती.
जेव्हा इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान इतर भारतीय क्रिकेटपटूंनी कोहलीवर एक मजेदार प्रँक केला होता. विराट कोहली (Virat Kohli) एकदा सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पाया पडण्यासाठी झुकला होता. पण प्रत्यक्षात तो एक प्रँक होता.
कोहलीने याविषयी बोलताना सांगितले की, “या गोष्टी कदाचित इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याशी संबंधित आहेत, जे 2008 मध्ये ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यापूर्वी घडले होते. मी भारताकडून श्रीलंकेविरूद्ध पदार्पण केले होते, परंतु सचिन तेंडुलकरने त्या मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. मला आशा होती की पुढील मालिकेत सचिनसोबत खेळण्याची संधी मिळेल.”
पुढे बोलताना विराट कोहली म्हणाला, “जेव्हा मी सचिनला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्याच्या पाया पडलो. सचिन मागे हटत होता, पण मीही काही बोलू शकत नव्हतो. मी त्याला म्हणालो, ‘मला सांगण्यात आले होते की, मला हे करावे लागेल. त्यामुळेच मी पाया पडलो.’ नंतर मला समजले की इरफान पठाण आणि हरभजन सिंग देखील या मजेदार घटनेचा भाग होते, जे इतर खेळाडूंना अशा गोष्टी करण्यास प्रवृत्त करत होते. या सर्वांनी मिळून मला फसवले होते.”
Virat Kohli talking about the prank happened while meeting Sachin Tendulkar. 🤣👌 pic.twitter.com/hPclPm0X8K
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 7, 2024
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (100) झळकावण्याचा रेकाॅर्ड ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे, त्याच्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक (80) शतके झळकावली आहेत. पण कोहलीने तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील 49 शतकांचा रेकाॅर्ड मोडला. कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक (50) शतके ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी रोहित शर्माकडून नेतृत्वगुण शिकलो”, टी20 कर्णधाराची कबूली
भारताची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानासाठी सज्ज! मोबाईलवर कुठे पाहायचा सामना? जाणून घ्या सर्वकाही
निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये का खेळायचं आहे? 42 वर्षीय जेम्स अँडरसननं सांगितलं कारण