भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला मंगळवारी (10 जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक पूर्ण करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 73 वे शतक ठरले.
A 45th ???? in ODI cricket for Virat Kohli ????#INDvSL | ????: https://t.co/E7dL6sWRIi pic.twitter.com/c8asH9SgVe
— ICC (@ICC) January 10, 2023
टी20 मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर विराट या मालिकेसाठी मैदानात उतरला. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी 143 धावांची भागीदारी करत भारताला मोठ्या लक्ष्याच्या दिशेने नेले. गिल बाद झाल्यानंतर मैदानावर उतरलेल्या विराटने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. खराब चेंडूवर चौकार षटकार आणि चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही तो थांबला नाही. गोलंदाजांवर त्याने वर्चस्व गाजवत 80 चेंडूंवर आपल्या 45 व्या वनडे शतकाला गवसणी घातली. यामध्ये 10 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. विराटने बाद होण्यापूर्वी 87 चेंडूंमध्ये 13 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 113 धावांची खेळी केली.
भारतीय संघाचा विचार केल्यास रोहित व गिल यांनी 143 धावांची तगडी सलामी दिली. रोहितने 83 तर गिलने 70 धावांचे योगदान दिले. तसेच विराट शतकाव्यतिरिक्त राहुलने 39 धावा केल्या. श्रीलंकेसाठी कसून रजिथा याने सर्वाधिक तीन बळी मिळवली. भारताने निर्धारित 50 षटकात 7 बाद 373 धावा धावफलकावर लावल्या.
(Virat Kohli Hits 45 ODI Century Against Srilanka In Guwahati ODI)