Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूर्याच्या शतकानंतर पुन्हा दिसला ‘सूरवीर’ बॉन्ड! विराटची इंस्टाग्राम स्टोरी होतेय व्हायरल

January 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Suryakumar-Yadav-And-Virat-Kohli

Photo Courtesy : Twitter/ICC


भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. या मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळालेल्या सूर्यकुमार यादव याने आपल्या कर्णधाराचा घेतलेला फलंदाजीचा निर्णय योग्य ठरवला. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढत झंझावाती नाबाद शतक झळकावले. हे त्याच्या टी20 कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले. त्याच्या शतकानंतर भारताचा वरिष्ठ फलंदाज व सध्या विश्रांतीवर असलेल्या विराट कोहली याने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले.

सध्या टी20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या सूर्याने या सामन्यात त्याच दर्जाची फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूत आपले 14 वे आंतरराष्ट्रीय टी20 अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढील 50 धावांसाठी त्याने केवळ 12 चेंडू घेत 45 चेंडूवर 6 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने आपले तिसरे टी20 शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत या सामन्यात 7 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 219 पेक्षा जास्त होता.

The Kohli-Surya bond is special. pic.twitter.com/QVJOBMRTK9

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 7, 2023

 

त्याच्या या खेळीनंतर विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत त्याचे कौतुक केले. विराटने सूर्याचे बॅट उंचावलेले छायाचित्र पोस्ट करत त्यावर टाळ्या वाजवल्याची व आगीची इमोजी लावली. तसेच, सूर्यकुमार यादव याला मेन्शन देखील केले.

सूर्यकुमार व विराट या जोडीला एकत्रितपणे सूरवीर असे म्हटले जाते. टी20 विश्वचषकावेळी स्वतः सूर्यकुमारने हे नामकरण केलेले. विराटने या मालिकेतून विश्रांती घेतली होती. मात्र, मंगळवारी सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत तो सहभागी होईल. त्यामुळे क्रिकेटच्या त्यांना तिसऱ्या क्रमांकावर विराट व चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमारची फलंदाजी पाहण्याची संधी मिळेल.

(Virat Kohli Instgram Story After Suryakumar Yadav Century Against Srilanka)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अशी राहिलीये टीम इंडियाच्या नव्या निवडसमिती सदस्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द; अनुभवाच्या बाबतीत…
वनडेत द्विशतक मारलेला ईशान टी20 मध्ये ठरतोय फिसड्डी! आकडे दाखवतायेत वस्तुस्थिती


Next Post
Suryakumar-Yadav-Record

भारतासाठी सूर्यकुमारने केली बोहनी! झळकावलं 2023चं पहिलं शतक, मागील 15 वर्षांची यादी पाहाच

Photo Courtesy: Twitter/ICC

श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करत टीम इंडियाचा वर्षातील पहिला मालिकाविजय! सूर्या-अर्शदीप चमकले

Suryakumar-Yadav-And-Rohit-Sharma

सूर्यकुमारने शतक झळकावलं, पण रोहितसारखी कामगिरी करण्यात पडला मागे; बातमी वाचाच

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143