Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसोटीच्या पहिल्या डावात विराटकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग! खेळपट्टीवर नाही देऊ शकला रोहितला साथ

कसोटीच्या पहिल्या डावात विराटकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग! खेळपट्टीवर नाही देऊ शकला रोहितला साथ

February 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat Kohli

Photo Courtesy: twitter/Screengrabs


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली पहिल्या डावात स्वस्तात बाद झाला. विराटने 26 चेंडूंचा समना केला आणि यात 12 धावा करून विकेट गमावली. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फी याने विराटला तंबूत धाडले. विराटच्या विकेटमुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. तर दुसरीकडे टॉड मर्फीचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.

पहिल्या दिवासाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 बाद 77 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी 77 धावांच्या पुढे खेळ सुरू केला. संघाची धावसंख्या 118 अशताना अश्विनने मर्फीच्याच चेंडूवर विकेट गमावली. अश्विनने 23 धावा करून विकेट गमावली आणि त्यानतंर फलंदाजीसाठी आला भारताचा अनुभवी चेतेश्वर पुजारा. रोहितच्या साथीने पुजारा संघासाठी मोठी भागीदारी करेल, अशी अपेक्षा होती. पण त्याने अवघ्या 23 धावांवर विकेट गमावली. पुजारानंतर दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीसाठी मैदानात आला. पण अश्विन आणि पुजाराप्रमाणे त्याने देखील जास्त वेळी रोहित शर्माची साथ दिली नाही. विराटने 26 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 12 धावा केल्या आणि यष्टीरक्षक एलेक्स केरी (Alex Carey) याने विराटला तंबूचा रस्ता दाखवला.

Virat Kohli on charge against spinners.pic.twitter.com/Mr1zYOB0e0

— Johns. (@CricCrazyJohns) February 10, 2023

भारताच्या डावातील 53 व्या षटकात टॉड मर्फी गोलंदाजीला आला. षटकातील पहिल्या चेंडूवर विराट स्ट्राईकवर होती. मर्फीने हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता. विराटने हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅठच्या किनारा लागलून यष्टीरक्षक केरीच्या हातात गेला. केरीकडून देखीव विराटला जीवदान मिळाले असते, पण त्याने दुसऱ्या प्रयत्नात चेंडू पुन्हा झेलला. विराट स्वस्तात बाद झाल्यानंतर चाहत्यांची चांगलीच निराशा झाली.  उभय संघांतील या सामन्याच एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. रोहितने 171 चेंडूत 100 धावा केल्या.

Virat Kohli's poor form continues in Test cricket !! #INDvAUS #viratkholiOUT pic.twitter.com/we2RaCRYMJ

— BII2🇮🇳 (@realbii2) February 10, 2023

टॉड मर्फी भारताविरुद्धच्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी हिरो ठरला. मर्फीने या सामन्यात कसोटी पदार्पण केले असून पहिल्याच कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत याची विकेट घेताच मर्फीच्या सामन्यातील पाच विकेट्स घेतल्या. (Virat lost his wicket cheaply in the first innings of the first Test against Australia)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, बुमराहच्या फिटनेसविषयी नवी अपडेट
रोहितचा कसोटी शतकाचा दुष्काळ संपला, नागपूर कसोटीत ठरला ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी डोकेदुखी


Next Post
Rohit-Sharma

'सेना' देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते 'हिटमॅन'ने दाखवलं करून

Photo Courtesy: Twitter/CA

मर्फीची चालली जादू! तब्बल नऊ वर्षानंतर ऑस्ट्रेलियासाठी केली कोणीतरी अशी कामगिरी

Rohit-Sharma-Century

ओपनर म्हणून कशीये रोहितची आकडेवारी? प्रत्येक चाहत्याने जाणून घेतलीच पाहिजे पठ्ठ्याची कामगिरी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143