रविवार रोजी (२६ सप्टेंबर) दुबईच्या शारजाह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २ दिग्गज कर्णधारांचे संघ अर्थातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स आमने सामने आले होते. बेंगलोरच्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला दमदार सुरुवात मिळाली होती. परंतु त्यांचे दोन्ही सलामीवीर पव्हेलियनला परतले आणि त्यांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. परिणामी बेंगलोरने ५४ धावांनी विजयी पताका फडकावली. या रोमहर्षक विजयानंतर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली याने विरोधी संघाच्या खेळाडूंची दखल घेत चाहत्यांचे हृदय जिंकले आहे.
विराट हा मैदानावर आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. परंतु खेळाडूवृत्ती दाखवणे, खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला मार्गदर्शन करत त्याचा उत्साह वाढवणे, अशा गोष्टीतही तो मागे नसतो. असेच काहीसे, त्याने मुंबईविरुद्धच्या सामना विजयानंतरही केले आहे.
मुंबई संघाचा युवा फलंदाज इशान किशन सध्या खराब फॉर्मशी झगडतो आहे. आतापर्यंत ८ आयपीएल सामन्यात फक्त १०७ धावा करणाऱ्या या फलंदाजाने बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात तर १२ चेंडूंमध्ये ९ धावा करत खराब फटक्यावर आपली विकेट गमावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या बॅटमधून आलेल्या छोटेखानी खेळीनंतर त्याचे हताश होणे साहजिक होते. त्यातही पुढच्या महिन्यात इशानला याच मैदानांवर अतिशय महत्त्वाचे टी२० विश्वचषक सामने खेळायचे आहेत. त्यामुळे युएईतील आपल्या प्रदर्शनाला पाहता त्याचे नैराश्य दुणावले असावे.
So this man is 'allegedly' an arrogant captain eh? 😊 https://t.co/TGvuhQsc0a
— Saurabh Malhotra (@MalhotraSaurabh) September 26, 2021
Nice to see Virat Kohli talking to Ishan Kishan after the match who hasn't scored much runs. #MI #RCB pic.twitter.com/a8mcauSYZt
— India Fantasy (@india_fantasy) September 26, 2021
Leader @imvkohli ❤️
Talking to Ishan kishan when Ishan is going though a tough phase. pic.twitter.com/gXHZiL0CFw— Y (@itsYashswiniR) September 26, 2021
विराट मागील बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळतो आहे. त्याच्या कारकिर्दीतील बऱ्याचदा त्याला चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याला इशानच्या उदासीनतेची कल्पना असावी. कदाचित याच कारणास्तव त्याने सामना संपल्यानंतर तो आपला प्रतिस्पर्धी असल्याचे विसरुन त्याला सांत्वना दिली आणि उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. विराट आणि इशानमधील संवादांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
https://twitter.com/sakthi_yogeesh/status/1442305232059305988?s=20
We have seen 'Mahi- Rat' moment .
But didn't expect to see " Rohi – rat " moment 👀❤️.#RohitSharma #ViratKohli #Rohirat #IPL2021 pic.twitter.com/QNmcw98dr9— Green 471 🚩 (@_Gree679) September 27, 2021
अनेकांनी विराटच्या या कृतीला पाहून त्याला मोठ्या मनाचा कर्णधार असे संबोधत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. विशेष बाब अशी की, विराटने फक्त इशानच नव्हे तर, सलग दुसऱ्या पराभवानंतर तोंड पडलेल्या मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचीही भेट घेतली आहे. यावरुन विराट खरोखरच भारतीय संघाला मिळालेला एक अतिशय उत्कृष्ट आणि आपल्या सहकाऱ्यांची काळजी करणारा कर्णधार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
हे नवीनच! रोहितनंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा ‘हॅट्रिकवीर’ ठरला हर्षल
‘मी म्हटलं होतं ना…’, चहलने पूर्वसूचना देत इशानचा काढला काटा; पाहा भारी व्हिडिओ