क्रिकेटविश्वात एकाहून एक सरस क्रिकेटपटू होऊन गेले आणि आताही आहेत. अगदी ६०-७० च्या दशकातही असे काही क्रिकेटपटू होते, जे कोणत्याही क्षणी अविश्वसनीय प्रदर्शन करत सामन्याचा कायापालट करत असत. मात्र क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात अशाप्रकारचे प्रदर्शन करणारे क्रिकेटपटू अगदी बोटावर मोजण्याइतके असत. परंतु आधुनिक क्रिकेटमध्ये बऱ्याचशा क्रिकेटपटूंनी तिन्ही स्वरुपात स्वत:ला सिद्ध केले आहे.
अशाच वनडे, टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या काही निवडक खेळाडूंची विस्डेनने सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या संघात भारताच्या ४ खेळाडूंना जागा मिळाली आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफघानिस्तानच्या खेळाडूंचाही यात समावेश आहे. मात्र भारताचा शेजारी देश, पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला जागा दिली गेली नाही.
विस्डेनच्या तिन्ही स्वरुपातील प्लेइंग इलेव्हनमध्ये भारतीय संघातील विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांना स्थान मिळाले आहे. तर रनमशिन विराट कोहलीकडे या संघाचे नेतृत्त्वपद सोपवण्यात आले आहे. तसेच गोलंदाजी विभागात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला जागा मिळाली आहे.
ऑस्ट्रेलिया संघातून फक्त डेविड वॉर्नर या एकाच क्रिकेटपटूला निवडण्यात आले आहे. तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांनाही विस्डेनच्या सर्व स्वरुपातील सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली आहे. जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर हे इंग्लंडचे अनुभवी खेळाडूसुद्धा या संघाचा भाग आहेत. तर अफगानिस्तानचा दमदार फिरकीपटू राशिद खान हादेखील या संघाता जागा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
विस्डेनची सर्व स्वरुपातील सक्रिय खेळाडूंची सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन– डेविड वॉर्नर, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केन विलियम्सन, बेन स्टोक्स, जोस बटलर, रविंद्र जडेजा, राशिद खान, जोफ्रा आर्चर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह भारतीय संघ उतरणार मैदानावर!
मुंबईत जन्मलेला ‘हा’ फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, न्यूझीलंडच्या अंतिम संघात मिळाली जागा
WTC Final: भारताविरुद्धच्या लढतीसाठी न्यूझीलंडचा अंतिम संघ जाहीर, पाहा कोण इन कोण आऊट